TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


अध्यात्म
८०१.
तीर्थे व्रते तपे ज्यालागी शिणावे । त्यासि कां नेणावे विवेकाने ॥१॥
विवेकाने अविवेकचि सारावा । निश्चय धरावा बहुविध ॥२॥
बहुविध जेथे बाणला निश्चय । त्यासि होय क्षयो वेळ नाही ॥३॥
वेळ नाही बहु रुप संहारतां । शाश्वत पाहतां आढळेना ॥४॥
आढळेना देव दिसेना लोचनां । ठाऊक सज्जनां दास म्हणे ॥५॥

८०२.
सृष्टीची रचना सर्वत्र पाहती । विवेके राहती ऐसे थोडे ॥१॥
ऐसे थोडे जन जयां आत्मज्ञान । नित्य निरंजन ओळखिला ॥२॥
ओळखिला देव ओळखिला भक्त । ओळखिला मुक्त योगिराज ॥३॥
योगियासी योग आहे निरंतर । वियोगे इतर वर्तताती ॥४॥
वर्तताती परी ऐसे न करावे । सार्थक करावे दास म्हणे ॥५॥

८०३.
करुनि अकर्ते होऊनियां गेले । तेणे पंथे चाले तोचि धन्य ॥१॥
तोचि धन्य जनी पूर्ण समाधानी । जनी आणि वनी सारिखाची ॥२॥
सारिखाचि जेथे तेथे पालटेना । न ये अनुमाना कोणीएक ॥३॥
कोणीएक लोक देहासि पाहती । अंतरीची गति कोण जाणे ॥४॥
कोण जाणे काय सांगतां मनीचे । जनासी जनाचे कळतसे ॥५॥

८०४.
आतांचि ये देही मुक्ति पाविजेना । तरी कां सज्जनां शरण जावे ॥१॥
शरण जातां भावे सज्जनचि व्हावे । शीघ्र उद्धरावे निरुपणी ॥२॥
निरुपणे निज स्वरुप सांपडे । गूज ठायी पडे अकस्मात ॥३॥
अकस्मात ठाव न दिसे आपुला । निरंजनी जाला निरंजन ॥४॥
निरंजन जाला ये लोकी असोनी । उन्मनीगीन्मनी नाडळती ॥५॥
नाडळती जेथे कांही देहभाव । तत्त्वज्ञाने वाव देहबुद्धि ॥६॥
देहबुद्धि गेली देखतदेखतां । मी हे कोण आतां सांपडेना ॥७॥
सांपडेना शुद्धि मीपण पाहतां । मीपण ते जातां वस्तुरुप ॥८॥
वस्तुरुप बोधे अरुप होइजे । विवेकाचे कीजे विचारणा ॥९॥
विचारणा जाली रामीरामदासी । आतां या जन्मांसी ठाव नाही ॥१०॥
ठाव नाही ऐसे राघवाचे देणे । थोराहुनी होणे थोर स्वये ॥११॥

८०५.
सृष्टि दृष्टिसी नाणावी । आत्मप्रचीत आणावी ॥१॥
दृश्याविरहित देखणे । दृश्य नुरे द्रष्टेपणे ॥२॥
सृष्टिवेगळा निवांत । देवाभक्तांचा एकांत ॥३॥
राम अनुभवासी आला । दासा विवाद खुंटला ॥४॥

८०६.
मायेभोवते भोंवावे । तरी तिने कुरवाळावे ॥१॥
संत एकटा एकला । एकपणाहि मुकला ॥ध्रु०॥
त्यासि माया असोनि नाही । आपपर नेणे कांही ॥२॥
रामीरामदासी माय । व्याली नाही चाटिल काय ॥३॥

८०७.
होता वृक्षाचे डहाळी । पक्षी गेला अंतराळी ॥१॥
तैसी माया ओलांडिली । वृत्ति स्वरुपी राहिली ॥ध्रु०॥
खेळकार सूत्र सोडी । गेली आकाशी वावडी ॥२॥
भूमंडळी होता आला । डोंग आकाशी उडाला ॥३॥
केले सिद्धीचे साधन । पाये वेंघला गगन ॥४॥
रामीरामदास म्हणे । दृष्टि पाहे तारांगणे ॥५॥

८०८.
दृश्य सांडुनियां मागे । वृत्ति गेली लागवेगे ॥१॥
माया सांडुनी चंचळ । जाला स्वरुपी निश्चळ ॥२॥
कांही भासचि नाडळे । वृत्ति निर्गुणी निवळे ॥३॥
चराचराते सांडिले । बहुविधे ओलांडिले ॥४॥
अवघे एकचि निर्गुण । पाहे वृत्तिच आपण ॥५॥

८०९.
अवघे पाषाण मांडिले । लोक म्हणती आपुलाले ॥१॥
सर्वां घटी देव एक । भेदे भाविला अनेक ॥ध्रु०॥
देव निर्मळ निश्चळ । पाहती पाषाणाची खोळ ॥२॥
रामदासाचे अंतर । देवापासी निरंतर ॥३॥

८१०.
देव निराकार त्या नाही आकार । तरी हा विस्तार कोणे केला ॥१॥
कोणे केला ऐसे शोधुनी पहावे । पाहोनी रहावे समाधाने ॥२॥
समाधान घडे विचार पहातां । बुझोनी राहातां सर्वकाळ ॥३॥
सर्वकाळ पूर्वपक्षेसी सिद्धांत । वेदांत धादांत सप्रचीत ॥४॥
सप्रचीत तरी विकारी विकार । देव निर्विकार जैसा तैसा ॥५॥
जैसा आहे तैसा विवेक पहावा । पडो नये गोंवा दास म्हणे ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-29T20:25:50.5470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

primary dip

  • स्त्री. मूलनति 
RANDOM WORD

Did you know?

कोणत्याही पूजेसाठी गणपती म्हणून चिकणी सुपारीला महत्व आहे, मग बाकीच्यांना कां नाही?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site