TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
गणपति

देवताविषयक पदे - गणपति

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


गणपति
१००९.
( राग-देशी खमाज; ताल-धुमाळी )
आधी वंदा रे मोरया ॥ विद्याबुद्धी देतो करुनी दया ॥ध्रु०॥
करा संकटचतुर्थी ॥ भावार्थबळे त्याची संकटे नासती ॥१॥
धन्य जे द्वारे करिती ॥ तयांच्या मनकामना पुरती ॥२॥
आघाडा आणि दुर्वा ॥ फुकाच्या तुम्ही देवरायासी पुरवा ॥३॥
देव हा विद्याधर ॥ दास म्हणे देतो सकळ धर ॥४॥

१०१०.
( चाल-अभंगाची )
देवदेवा रे मोरया रंगी नाचे दे० ॥
अंदु वांकी पायी पायी घागरिया ॥ध्रु०॥
शरीर भारी चपळ भारी । नाटक भारी रंगलीळा ॥१॥
आनंदवेळा सुखसोहळा । दास ह्मणे गायनी कळा ॥२॥

१०११.
( चाल-अभंगाची )
करेचे पाठारी एक मोरया रे मोर०॥
त्याचे भजनी उरवी रया रे ॥ध्रु०॥
कोठे तरी आधी गणेशाचे पूजन रे पू० ।
बाळपणी करणे मोरयाचे भजन रे ॥१॥
चिंता मनींची हरी चिंतामणी रे० ।
न कळे न कळे अगाध करणी रे ॥२॥
विघ्नहर विघ्नांचा करितो संहार रे० ।
भक्तिभावे भजतां देव अपार रे ॥३॥
मंगळदायक देव मंगळमूर्ति रे० ।
दास म्हणे मोरयाची उत्तम कीर्ति रे ॥४॥

१०१२.
( राग-श्रीराग; ताल-चौताल )
गणपति गणराज धुंडिराज महाराज ।
चिंतामणी मोरेश्वर याविण नाही काज ॥१॥
अकार उकार मकार तुझी शुंडा अनिवार ।
ब्रह्माविष्णुमहेश हे तरी तुझेच अवतार ॥२॥
त्रिगुणे तूं गुणातीत नामरुपाविरहित ।
पुरुष नाम प्रकृतीत नाही अंत हा ॥३॥
सच्चिदानंद देवा आदि अंत तुला च ठावा ।
दास म्हणे वरद भावा कृपादृष्टि हा ॥४॥

१०१३.
( चाल-संतपदाची जोड० )
तांडव नृत्य करी, गजानन० ॥ध्रु०॥
धिमि कीटी धिमि कीटी मृदंग वाजे ।
ब्रह्मा ताल धरी । गजा० ॥ध्रु०॥
तेहतीस कोटी सभा घनदाटी ।
मध्ये शिव गौरी ॥ गजा० ॥१॥
रामीरामदास सदोदित । शोभे चंद्र शिरी ॥ गजा० ॥३॥

१०१४.
( राग-कानडा; ताल-सवारी किंवा त्रिताल )
प्रगटत नटवेषे गणाधीश । प्रगटत नटवेषे ॥ध्रु०॥
ठमकत ठमकत झमकत चमकत । हरुषत शिव तोषे ॥१॥
धिधि किट धिधि किट थोंगिट थरिकट परिसित सुख लेशें ॥२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-29T22:40:22.7300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वर्णा

  • पु. ( राजा . ) वाल , वरणा पहा . - कृषि ३३१ . ( अनेक वचनी प्रयोग ) वर्णे . 
RANDOM WORD

Did you know?

shreeyantra siddha kase karave ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.