TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
श्रीराम

देवताविषयक पदे - श्रीराम

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


श्रीराम
१०१९.
( चाल-भूपाळीची )
श्रीराम गणेश वेदमाता । श्रीराम सद्गुरु भवत्राता ।
श्रीराम सज्जन श्रोता वक्ता । स्वानुभवकथा श्रीराम ॥१॥
श्रीराम भक्ती आतुडे सांग । श्रीरामे सदृढ वैराग्ययोग ।
श्रीरामे आत्मज्ञान अव्यंग । विज्ञानपूर्ण श्रीराम ॥२॥
श्रीराम सार्थक श्रवण । श्रीराम सकळ मनन ।
श्रीराम अखंड निजध्यान । साक्षात्कार संपूर्ण श्रीराम ॥३॥
श्रीराम शक्तिचक्रा चालक । श्रीराम सकळां देही व्यापक ।
श्रीराम होत्साता एक । नित्य निष्कलंक श्रीराम ॥४॥
श्रीराम वाचे नवचे वर्णिला । श्रीराम मने नवचे कल्पिला ।
श्रीराम नवचे चित्ती चिंतिला । आत्मरुप पाहिला नवचे नेत्री ॥५॥
श्रीराम सकळां आद्यां आद्य । श्रीराम सकळां वद्यां वद्यं ।
श्रीराम सकळां स्वतःसिद्ध । रामदासी बोध श्रीराम ॥६॥

१०२०.
( चाल-गड्यांनो घ्या हरिच्या नामा० )
आतां विलंब न लावा हो । पैं या प्रसाद घ्यावा हो ॥ध्रु०॥
सांगे मुनिवर तिघींस सत्वर स्नान दान सारा ।
पुरुष पराक्रमि तो जगदीश्वर येइल तुमच्या उदरां ॥१॥
ज्येष्ठ वरिष्ठ वांटुनि देउनि यागसिद्धि केली ।
ज्येष्ठ भागा न पवे म्हणउनि कैकई कष्टी जाली ॥२॥
भविष्य वदला वाल्मिक ज्याला चुकविल कोण तयाला ।
विकल्प रचला तटस्थ पाहतां घारी अंश नेला ॥३॥
भाग विभागुनि दे कौसल्या तेचि परि सुमित्रा ।
दोनि अंश घेउनि देती समजविल्या सत्पात्रा ॥४॥
हर्षत नृपवर सकळ ऋषेश्वर यज्ञ सिद्ध जाला ।
भूतळवासी येउनि समयी आनंदविले दासाला ॥५॥

१०२१.
( राग-कानडा; ताल-दादरा; चाल-दिंडीची. )
दशरथ राजा म्हणे रामा राजबाळे ।
निजमानसि जें असे प्रिय प्रिय बोले ॥ध्रु०॥
तंव त्या बोलण्या अतीत अनुभवे डोले ।
अनुसंधाने बैसली स्वानुभवी डोले ॥१॥
नाही नाही यया भेदभाव नाही ।
गर्भगुणे हे भरली नेणो कोण वाही ॥२॥
भूप म्हणे कटकटा पोटां महद्भूत आले ।
कैचे संसारीचे सुख कर्म हे वोढवले ॥३॥
गुरु म्हणती धन्य जिणे भक्तिचेनि मेळे ।
रामीरामादासी रुप अरुप प्रगटले ॥४॥

१०२२.
( राग-रामकली; चौताल; चाल-बापा मोरया रे । )
आनंदु रे आजी आनंदु रे ॥ध्रु०॥
नवमी सुदिन आला राम प्रगट जाला ।
नीच नवा नित्य ब्रह्मानंदु रे ॥१॥
निशाचरी गांजिले देव आनंदले ।
अवतारी स्वानंदकंदुरे ॥२॥
वैकुंठीहुनि येणे जाले दीनांकारणे ।
आम्हां सोडविता करुणासिंधु रे ॥३॥
ऋषि संत सज्जन उदंड मिळाला मेळा ।
चर्चा करिती शास्त्रवेदु रे ॥४॥
हरिदास गजरे गर्जती जयजयकारे ।
वाजविति ताल मंदु रे ॥५॥
बहु थाट दाटले भाट वाखाणिती ।
चपळ बोलती वाणी शुद्ध रे ॥६॥
नाना वाद्यध्वनि उमटति गगनी ।
सकळां लागला रामवेधु रे ॥७॥
अबीर गुलालाचे धूशर दाटले ।
परिमळ येतसे सुगंधु रे ॥८॥
नायके कोणाचे कोणी जाली अति दाटणी ।
ठेलिती एकमेकां स्कंदु रे ॥९॥
पाहतां चापपाणी पुरेना लोचनां धणी ।
खणोखणी उभी वनितावृंदु रे ॥१०॥
श्रवण मनन निजध्यास समाधान ।
रामीरामदासी निजबोधु रे ॥११॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-02-10T21:32:11.1500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बाहणें

  • स.क्रि. पेलणें ; वाहणें . मत्स्ययंत्र गगनोदरीं । धनुष्य बाहूनि भेदन करी । - मुआदि ३९ . ८० . [ सं . बहू = वाहून नेणें ] 
  • स.क्रि. 
  • ( काव्य ) बोलावणें ; हांक मारणें . धेनुवत्सें तुला बाहती माधवा । - भूपाळी . 
  • v t  Call. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

गणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site