TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


अध्यात्म
७६७.
सोहं हंसा म्हणिजे तो मी मी तो ऐसे । हे वाक्ये विश्वासे विवरावे ॥१॥
विवरावे अहं ब्रह्मास्मिवचन । ब्रह्म सनातन तूंचि एक ॥२॥
तूंचि एक ब्रह्म हेंचि महावाक्य । परब्रम्ही ऐक्य अर्थबोध ॥३॥
अर्थबोध रामीरामदासी जाला । निर्गुण जोडला निवेदने ॥४॥

७६८.
चित्त देउनी ऐका रे । पोहणारा पडिला धारे ॥१॥
मन मुळाच्या शेवटे । वाहे जीवन उफराटे ॥२॥
उगमासी संगम जाला । रामदासी शब्द निवाला ॥३॥

७६९.
पूर्वी पाहतां मी कोण । धुंडी आपणा आपण ॥१॥
स्वये आपुला उगव । जाणे तोचि महानुभाव ॥२॥
कोण कर्म आचरलो । कैसा संसारासी आलो ॥३॥
आले वाटे जो मुरडे । देव तयासी सांपडे ॥४॥
आली वाट ते कवण । मायेचे जे अधिष्ठान ॥५॥
रामदासाची उपमा । ग्राम नाही कैची सीमा ॥६॥

७७०.
दृश्य हे दिसेना अंधारी पाहतां । परी तया ज्ञाता म्हणो नये ॥१॥
म्हणो नये तैसे अज्ञानचि ज्ञान । पूर्ण समाधान वेगळेचि ॥२॥
वेगळेचि कळे क्षीरनीर हंसा । दास म्हणे तैसा अनुभव ॥३॥

७७१.
मर्यादा सागरा आणि दिनकरा । अंतरिक्ष तारा जयाचेनि ॥१॥
जयाचेनि मेघ पडे भूमंडळी । पिके यथाकाळी वसुंधरा ॥२॥
वसुंधरा बहु रंगे विस्तारली ।  जीवसृष्टि जाली जयेचेनि ॥३॥
जयेचेनि सर्व सृष्टि चालताहे । तयालागी पाहे शोधुनीयां ॥४॥
शोधुनियां पाहे देव सर्व कर्ता । तरिजे विवर्ता जयाचेनि ॥५॥
जयाचेनि भक्ति जयाचेनि मुक्ति । जयाचेनि युक्ति वाढतसे ॥६॥
वाढतसे ज्ञान स्वरुपी पाहतां । जयाचेनि सत्ता चालतसे ॥७॥
चालतसे सत्ता ते मायारुपाची । शुद्ध स्वरुपाची मात नव्हे ॥८॥
मात नव्हे श्रुत अनुभवेविण । रामदास खूण सांगतसे ॥९॥

७७२.
तुम्ही आम्ही करुं देवाचा निश्चयो । जया नाही लय तोचि देव ॥१॥
देव हा अमर नित्य निरंतर । व्यापुनी अंतर देव आहे ॥२॥
देव आहे सदा सबाह्य अंतरी । जीवा क्षणभरि विसंबेना ॥३॥
विसंबेना परी देवासी नेणवे । म्हणोनियां धांवे नाना मती ॥४॥
नाना मती देव पाहतां दिसेना । जंव ते वसेना ज्ञान देही ॥५॥
ज्ञान देही वसे तया देव दिसे । अंतरी प्रकाशे ज्ञानदृष्टि ॥६॥
ज्ञानदृष्टि होतां पाविजे अनंता । हा शब्द तत्वतां दास म्हणे ॥७॥

७७३.
विश्रांतीचे स्थळ स्वरुप केवळ । द्वैत तळमळ जेथे नाही ॥१॥
जेथे नाही काया नाही मोह माया । रंका आणि राया सारिखेंचि ॥२॥
सारिखेंचि सदा सर्वदा स्वरुप । तेंचि तुझे रुप जाण बापा ॥३॥
जाण बापा स्वये तूंचि आपणासी । सोहं स्मरणासी विसरतां ॥४॥
विसरतां सोहं स्मरण आपुले । मग गुंडाळले मायाजाळी ॥५॥
मायाजाळी तुझा तूंचि गुंतलासी । यातना भोगिसी नेणोनियां ॥६॥
म्हणोनियां होई सावध अंतरी । सोहं दृढ धरी दास म्हणे ॥७॥

७७४.
जीव एकदेशी शीव एकदेशी । याचेनि सायासी कांही नव्हे ॥१॥
हित करवेना आपुले आपण । त्यासी कर्तेपण घडे केवी ॥२॥
देह त्याचा त्याला न जाय राखीला । निमित्ते भक्षीला अकस्मात ॥३॥
काळ अवर्षण पडतां कठीण । तेव्हां पंचप्राण सोडूं पाहे ॥४॥
जीवा जीवपण देता नारायण । तयाविणे कोण करुं शके ॥५॥
राया करी रंक रंका करी राव । तेथे धरी भाव आलया रे ॥६॥
आलया रे जना भावेसी कारण । येर निष्कारण सर्व कांही ॥७॥
सर्वही हे देहे देवाचिपासोनी । तयाचे भजनी रामदास ॥८॥

७७५.
मन हे विवेके विशाळ करावे । मग आठवावे परब्रह्म ॥१॥
परब्रह्म मनी तरीच निवळे । जरी बोधे गळे अहंकार ॥२॥
अहंकार गळे संताचे संगती । मग आदि अंती समाधान ॥३॥
समाधान घडे स्वरुपी राहतां । विवेक पाहतां निःसंगाचा ॥४॥
निःसंगाचा संग सदृढ धरावा । संसार तरावा दास म्हणे ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-29T20:22:38.6530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

immovable property

  • स्थावर संपत्ति 
  • स्थावर संपत्ति 
  • स्थावर संपत्ति 
  • स्थायी मालमत्ता (स्थावर मालमत्ता) 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

नजर लागते किंवा दृष्ट लागते म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.