TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अंजन

भारुड - अंजन

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


अंजन
१. अंजन ( अभंग )
८९५.
डोळा हा गाळोनी साधिले अंजन । निजी निजधन प्राप्त जाले ॥१॥
पायाळाचे दिले बळीदान अंग । अंगी अंगसंग संगवीण ॥२॥
लाभ न अलाभ वृत्ति ना निवृत्ति । शुद्धबुद्ध ज्ञप्ति मावळली ॥३॥
आकाश हरपले चिद्रूप संचले । सूर्यावीण पाहले सदोदित ॥४॥
नाद बिंदु कळा ज्योति विश्रमली । रामदासा जाली वस्ति तेथे ॥५॥

८९६.
ऐका ऐका थांबा थांबा । कोण फळ म्हणविले बा ।
सकळां फळांमध्ये आंबा । मोठे फळ ॥१॥
त्याचा स्वाद अनुमानेना । रंग रुप हे कळेना ।
भूमंडळी आंबे नाना । नाना ठायी ॥२॥
मावे हिरवे सिंधुरवर्ण । गुलाली काळे गौरवर्ण ।
जांभळे ढवळे रे नाना जाण । पिवळे आंबे ॥३॥
आंबे एकरंगी दुरंगी । पाहो जातां नाना रंगी ।
अंतरंगी बाह्यरंगी । वेगळाले ॥४॥
आंबे वाटोळे लांबोळे । चापट कळकुंबे सरळे ।
भरीव नवनीताचे गोळे । ऐसे मऊ ॥५॥
नाना फळांची गोडी ते । आंब्यामध्ये आढळते ।
सेपे कोथिंबिरी वासाचे । नानापरी ॥६॥
आंबे वाकडेतिकडे । खर्बड नाकाडे लंगडे ।
केळे कुहिरे तुरजे इडे । बाह्याकार ॥७॥
कोयी लहान दाणे मोठे । मगज अमृताचे साटे ।
हाती घेतां सुख वाटे । वास येतां ॥८॥
सोफ सालीहि असेना । नासक वीटक दिसेना ।
टाकावे वस्त्रावरी नाना । कोरडे आंबे ॥९॥
एक आंबा वाटी भरे । नुस्ते रसामध्ये गरे ।
आतां श्रमचि उतरे । संसारीचा ॥१०॥
आंबा तणगाऊ नासेना । रंग विरंग दिसेना ।
सुकतां गोडी हि सांडिना । कांही केल्या ॥११॥
भूमंडळी आंबे पूर्ण । खाऊन पाहतो तो कोण ।
भोक्ता जगदीश आपण । सकळां ठायी ॥१२॥
नाना वर्ण नाना स्वाद । नाना स्वादांमध्ये भेद ।
नाना सुवासे आनंद । होत आहे ॥१३॥
आंबे लावावे लाटावे । आंबे वाटावे लुटावे ।
आंबे वांटितां सुटावे । कोणातरी ॥१४॥
नाही जळ तेथे जळ । कां ते उदंड आम्रफळ ।
परोपकाराचे केवळ । मोठे पुण्य ॥१५॥
पुण्य करावे करवावे । ज्ञान धरावे धरवावे ।
स्वये तरावे तरवावे । एकमेकां ॥१६॥
मी तो बोलिलो स्वभावे । यांत मानेल तितुके घ्यावे ।
कांही सार्थक करावे । संसाराचे ॥१७॥
दास म्हणे परोपरी । शब्दापरीस करणी बरी ।
जिणे थोडे ये संसारी । दो दिसांचे ॥१८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:37.6330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

डिरंगी

  • स्त्री. डिंगरी पहा . 
RANDOM WORD

Did you know?

हल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.