TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
पाळणा

देवताविषयक पदे - पाळणा

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


पाळणा
१०५१.
( राग-असावरी; ताल-दीपचंदी )
सखया भीमा ॥ध्रु०॥
क्षुधा नेणे चि माता । जातो ऐसाचि आतां ।
कोपिली वनदेवता ॥स० ॥१॥
पाठी लाविले पोट । खोलाविले नेत्रवाट ।
फासोळ्या दिसती दाट ॥स० ॥२॥
मणी दिधला करी । जाय लंकेभीतरी ।
अन्न घेईं तृप्तीवरी ॥स० ॥३॥
येरे वंदिले पाय । अन्न म्हणिजे काय ।
फळे घेऊनियां खाय ॥स० ॥४॥
संकट पडिले । माये पडिले फळचि खाये ।
कुसी कांडोळिताहे ॥स० ॥५॥
स्वयंपाकी सोंवळा । नेघे स्पर्शिल्या फळा ।
वने लक्षिले डोळां ॥स० ॥६॥
आज्ञा वंदुनी भला । वना निःपात केला ।
दासे ढेंकर दीधला ॥स० ॥७॥

१०५२.
( चाल-काळ विक्राळ )
ऐसा हनुमंत वीर विख्यातु सेवक श्रीरामाचा ।
लंका जाळिली निर्दाळिली असंख्य सामर्थ्याचा ।
सकळै नाडिले मग वाडिले वेग किती वायोचा ॥ध्रु०॥
नमूं गणेशा सुंदर वेषा रंगणी नाचतां ।
नमूं गायनी वरदायनी विश्वजनाची माता ।
नमूं सद्गुरु पैलपारु पाववी तत्त्वता ।
श्रोते अवधान सावधान आइका आतां ॥१॥
सीता शोधिली मग बोधिली मुद्रिका देउनि ।
मागे येताती रघुपती वान्नर वीर घेउनी ।
रावण उडाला परि बुडाला तुज माते नेउनी ।
माती खाइल मग जाइल वैभव हे ठेउनी ॥२॥
सीता मंदली आनंदली देखुनि हनुमंताला ।
क्षुधा सांगतो मग मागतो दे वो कांही खायाला ।
भोजन नावडे मज आवडे फळमूळ घ्यायाला ।
आज्ञा घेईन मग जाईन वनी क्रीडायाला ॥३॥
बोले सीता रे हनुमंता रे कपटी रजनीचर ।
तूं तरी लडिवाळ तान्हे बाळ जाउन ये सत्वर ।
वरतां चडसी सांपडसी तुज नेती बनकर ।
ऐसे न करावे पडिले फळ खावे मानावे उत्तर ॥४॥
आज्ञा प्रमाण तुझी आण वर मी चढेना ।
ऐसे बोलिला मग चालिला मानीले वचना ।
झाडे मोडितो मग पाडितो पडिली फळे नाना ।
कांही भक्षिली मग नासिली विध्वंशिले वना ॥५॥
आधी कडकावी मग भडकावी लंकेचा चौबारा ।
झाडे मोडितो मग पाडितो ताडितो बनकरां ।
पुच्छे पिछाडी आली धाडी अवघ्या निशाचरां ।
शत्रु गळाले मग पळाले कांपती थरथरां ॥६॥
आले वान्नर कपिथोर पळाले बनकर ।
धापा दाटली मग लोटली जेथे दशशिर ।
म्हणती लाटिलो जी कूटिलो जाहालो जर्जर ।
आतां सांभाळा जी भूपाळा आले विघ्न थोर ॥७॥
रावण कोपला संतापला काय रे पाहतां ।
धीट मर्कट ते उद्धट धरुनि आणा आतां ।
म्हणोनि धाडिले ते ताडिले निमिष्य न लागतां ।
पुढे दळभार तो सत्वर धाडीतो मागुता ॥८॥
वीर धांवले ते पावले वेढीयले वन ।
दैत्य उफाळले चौताळले मांडियेले धन ।
कपी हुंकारे भुभुःकारे होताहे निर्वाण ।
करी झगदा रणरगडा संग्रामे दारुण ॥९॥
हरी उठला पळ सूटला संहार दैत्यांचा ।
वैरी कष्टले मग भ्रष्टले वध केला अखयाचा ।
लोक हडबडिला रे गडबडिला भडभडिला लंकेचा ।
दास जयवंत यशवंत आला रघुनाथाचा ॥१०॥

१०५३.
रावण सीता दडवी । भीम निशाचर बडवी ।
अघटित ते ते घडवी । वर रजनीचर रडवी ॥ध्रु०॥
जाउनि सीता शोधी । सकळांचा विरोधी ।
वानर मोठा क्रोधी । त्रिकुटी जन रोधी ॥१॥
मोठी आली धाडी । पुच्छाने पछाडी ।
होती ताडातोडी । कठीण झोडाझोडी ॥२॥
दैत्यी केले चाळे । सुरवर बंदिशाळे ।
त्या रागे उफाळे । वन्हीचे उबाळे ॥३॥
बनी बने कडकावी । बळकट शिक्षा लावी ।
भुजाबळे भडकावी । लंकेत धडकावी ॥४॥
सीता शोधूनि गेला । हलकल्लोळ केला ।
भेटे राघवाला । दास्यवे निवाला ॥५॥

१०५४.
( राग-भैरव; ताल-दादरा )
बहु राक्षस मातले । देव बंदिखानी घातले ।
भोग भोगिती आपुलाले रेरेरेरे ।
बहुतचि कष्ट जाले जीवा ।
कधी सरेल हा पाप ठेवा रे० ।
दाशरथी कारेल उठावा रे ॥१॥
देव गजवदन बोलिला ।
खर राखितां जन्म गेला ।
भोग नेणो नाही पुरला रे० ।
दुःख सांगावे कोणाला रे ॥२॥
देव बोलिला सदा वरु ।
केश कठीण किती भादरु ।
जीणे कठिण जाले थोरु रे० ।
कधी पावेल हा रघुवीरु रे ॥३॥

१०५५.
( राग-कल्याण; ताल-दादरा )
अंतरदुःखी जाहले सकळ । करिती तळमळ ॥ध्रु०॥
देव स्वर्गावासी बंधन तयांसी । सर्व झाले विदेशी ॥१॥
अखंड गांजितो बहु लज्जा घेतो । घडि घडि त्रासितो ॥२॥
स्नानशुचि नाही अन्नवस्त्र नाही । सुख कांहीच नाही ॥३॥
देव अवकळले कासावीस जाले । दुःखसागरी बुडाले ॥४॥
सीताशुद्धि जाली रामे चाली केली । दासदैन्ये फेडिली ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-02-10T21:50:22.2200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खाण्यास अन्न नाही, पांघरण्यास आंख नाही

  • (आंख = वस्त्र, कापडाचा तागा.) ज्यास खाण्यापिण्यास किंवा पांघरण्यास वस्त्र नाही असा निराधार कंगाल मनुष्य. 
RANDOM WORD

Did you know?

ऐश्वर्याचे प्रकार किती व कोणते?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.