TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
उपदेशपर

विविध विषय - उपदेशपर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


उपदेशपर
६९१.
मना तूंचि शिकवसी । सेखी तूंचि नायकसी ॥१॥
काय सूचिसी पारेरा । शरण जाई रघुवीरा ॥२॥
किती साचाचिये परी । करीसी शब्द भरोवरी ॥३॥
रामीरामदास म्हणे । जळो बहिर्मुखाचे जिणे ॥४॥

६९२.
परिचये जेथे अत्यंत संबंध । तेथे उठे खेद विकल्पाचा ॥१॥
म्हणोनियां मना निस्पृह असावे । सर्वथा नसावे एके ठायी ॥२॥
एके ठायी वास करितां तापस । पडती सायास विवेकाचे ॥३॥
विवेकाचे जन मिळतां संकट । लागे खटपट सर्वकाळ ॥४॥
सर्वकाळ गेला उद्वेगी पडतां । कोणे वेळे आतां समाधान ॥५॥
समाधान चळे अहंता प्रबळे । तेणे गुणे पोळे अभ्यतर ॥६॥
अभ्यंतर पोळे राम विसंभता । दास म्हणे आतां समाधान ॥७॥

६९३.
सपनीच्या सुखे सुखावला प्राणी । थोर जाला हाणी जागृतीसी ॥१॥
जागृतीसी नाही सपनीचे सुख । तेणे जाले दुःख बहुसाल ॥२॥
बहुसाल खेद मानिला अंतरी । वांयां झडकरी जागा जालो ॥३॥
जागा जालो म्हणे वांया अवचितां । निजोनी मागुता सुख पाहे ॥४॥
सुख पाहे पुन्हां स्वप्नीचे न दिसे । भयानक दिसे प्राणियांसी ॥५॥
प्राणियांसी दुःख जाहले मागुते । जाग जालीया ते सर्व मिथ्या ॥६॥
मिथ्या सुख दुःख स्वप्नाचा व्यवहार । तैसा हा संसार नाथिलाचि ॥७॥
नाथिलाचि जाय क्षण आनंदाचा । सवेंचि दुःखाचा क्षण जाय ॥८॥
क्षण एक मना राघवी सावध । तेणे नव्हे खेद दास म्हणे ॥९॥

६९४.
देवे जन्मासि घातले । नाना सुख दाखविले ॥१॥
त्यास कैसे विसरावे । पुढे कैसे निस्तरावे ॥२॥
कुळमूळ सांभाळिले । नानाप्रकारे पाळिले ॥३॥
दास म्हणे देवेंविण । दुजा सोडविता कोण ॥४॥

६९५.
अन्न देणारा श्रीहरि । तोचि प्रतिपाळ करी ॥१॥
तया चुकली बापुडी । अन्न अन्न करिती वेडी ॥२॥
ज्या देवाचे आज्ञाधारी । मेघ वर्षती अंबरी ॥३॥
रामदास म्हणे ऐक । आदि अंती देव एक ॥४॥

६९६.
माया लाविली मायिक । आदिअंती देव एक ॥१॥
तया चु० ॥ध्रु०॥
देव संकटी पावतो । देव अंती सोडवितो ॥२॥
रामदासी नवलपरी । देव सर्वांचे अंतरी ॥३॥

६९७.
देव तारी देव मारी । देव सर्व कांही करी ॥१॥
तया चुकली बापुडी । अन्न अन्न करिती वेडी ॥ध्रु०॥
अन्न उदक देवे केले । सर्व तेणेचि निर्मिले ॥२॥
रामदास म्हणे एक । देव त्रैलोक्यनायक ॥३॥

६९८.
देव घालितो संसारी । देव सर्व कांही करी ॥१॥
तया चु० ॥ध्रु०॥
न कळे देवाचे करणे । राव रंक तत्क्षणे ॥२॥
रामदास म्हणे पाही । देवेविण कांही नाही ॥३॥

७००.
प्राणी संसारासी आला । तेणे वंश उद्धरिला ॥१॥
धन्य धन्य तोचि जनी । धन्य तयाची जननी ॥२॥
वेदमर्यादा सांवरी । प्रीति ज्याची देवावरी ॥३॥
जाणे नैश्वर संसार । लावी कारणी शरीर ॥४॥
देवी ब्राह्मणी आवडी । जाणे हरिकथेची गोडी ॥५॥
रामदासी रामराव । तेथे त्याचा दृढभाव ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-26T07:55:47.8000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Did you know?

वारी म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.