TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
भक्तिपर अभंग

विविध विषय - भक्तिपर अभंग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


भक्तिपर अभंग

४४१ .

मज गांजिले ते साहे । परी भक्ताचे ते न साहे ॥१॥

माझ्या भक्ता शीण व्हावा । मग मजसि त्यासी दावा ॥२॥

मज अवतार धरणे । माझ्या भक्तांच्या कारणे ॥३॥

देव म्हणे भक्तजनी । चिंता न धरावी मनी ॥४॥

४४२ .

आतां बोलावे ते किती । मनी पहावी प्रचीती ॥१॥

तुम्हां संकटांच्या वेळे । काय झांकितो मी डोळे ॥२॥

सेवकाचा साभिमान । समर्थाचे हे लक्षण ॥३॥

निजभक्तांसी पाळावे । दुर्जनांसि निर्दाळावे ॥४॥

४४३ .

अरे भक्तांचा कोंवसा । मनी धरावा भरंवसा ॥१॥

समर्थाचिया सेवकां । काय करवेल रंका ॥२॥

कोप येतांचि ते घडी । घेईन काळाची नरडी ॥३॥

भक्तां म्हणे भक्तजनी । चिंता न धरावी मनी ॥४॥

४४४ .

एक लक्ष दिनमणी । तृप्त होतसे कमळिणी ॥१॥

तैसा देव आहे दुरी । परि तो भक्तांचे अंतरी ॥२॥

दोन लक्ष निशापति । तेणे चकोर तृप्त होती ॥३॥

रामदास म्हणे घन । देतो चातका जीवन ॥४॥

४४५ .

बाळक जाणेना मातेसी । तिचे मन तयापाशी ॥१॥

तैसा देव हा दयाळ । करी भक्तांचा सांभाळ ॥२॥

धेनु वत्साचेनि लागे । धांवे त्याचे मागे मागे ॥३॥

पक्षी वेंघतसे गगन । पिलांपाशी त्याचे मन ॥४॥

मत्य्स आठवितां पाळी । कूर्म दृष्टीने सांभाळी ॥५॥

रामीरामदास म्हणे । मायाजाळाची लक्षणे ॥६॥

४४६ .

बाळपणे लोभ करी । माता नाही जन्मवरी ॥१॥

देव दीनांचा दयाळ । दास पाळी सर्वकाळ ॥२॥

मनासारिखे न होतां । बालकासि मारी माता ॥३॥

दास म्हणे सांगो किती । बाप लेकांसी मारिती ॥४॥

४४७ .

मायबापे सांभाळिती । लोभाकारणे पाळिती ॥१॥

तैसा नव्हे देवराव । त्याचा कृपाळु स्वभाव ॥२॥

चंद्र सूर्य मावळती । घन आकाशी लोपती ॥३॥

रामीरामदास भाव । केला संसारचि वाव ॥४॥

४४८ .

एक सहस्त्र कोटीवरी । जाली अन्यायांची परी ॥१॥

तरी देव उपेक्षिना । अंती निष्ठुर होइना ॥२॥

शरणांगत भांबावले । भजन देवाचे चुकले ॥३॥

रामीरामदास भाव । केला संसारचि वाव ॥४॥

४४९ .

देव भक्तांचा कैवारी । रक्षितसे नानापरी ॥१॥

काष्ठस्तंभी प्रगटला । तेणे प्रल्हाद रक्षिला ॥२॥

महासंकती राखिले । गजेंद्रासी सोडविले ॥३॥

कूर्मरुपे धरिली धारा । जाला वराह दुसरा ॥४॥

तये द्रौपदीकारणे । वस्त्रे दिली नारायणे ॥५॥

जाणे दासाचे अंतर । लाखाजोहरी विवर ॥६॥

४५० .

भक्तिलागी पावे नेटे । वारी भक्तांची संकटे ॥१॥

देव भांवे लांचावला । त्यासि अभिमान लागला ॥२॥

अपुल्या भक्ताचे जे उणे । ते साहेना कोटिगुणे ॥३॥

दास म्हणे नानापरी । देव भक्तांचा कैवारी ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-24T09:31:57.7800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नाभी

 • उद्गा . १ भिऊं नकोस ! - एभा ३० . ३४८ . गरुड येतो फडत्कारे । नाभी नाभी म्हणे त्वरे । - तुगा ६७८ . २ नाभिकार . ना भी असा तुटक उच्चार करतात . [ न + भिणे ] 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.