मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
आनंदाचा। उगवला दिवस सोन्य...

स्वातंत्र्यदेवीचे शुभ आगमन - आनंदाचा। उगवला दिवस सोन्य...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


आनंदाचा।
उगवला दिवस सोन्याचा॥

मालिन्यरात्र लोपली
सौभाग्यउषा उजळली
सत्कीर्तिगुढी उभविली
चला रे नाचा॥ उगवला....॥

गंभीर भेरिगर्जन
शंखादि मंगलस्वर
देवता येतसे दुरुन
मांगल्याचा॥ उगवला....॥

ते पहा मराठी भाले
चपळेपरि चमकत आले
मंदील पाठिवर खेळे
तच्छौर्याचा॥ उगवला....॥

शत्रुच्या पिऊन रक्ताला
यज्जीव निरंतर घाला
तो आला रजपुत भाला
तत्तेजाचा॥ उगवला....॥

ते पहा शिवाजी राजे
तो प्रतापसिंहही साजे
पृथ्विराजहि तेथ विराजे
धन्यत्वाचा॥ उगवला....॥

ती जिजा तुम्हां दिसली का
ती उमा तुम्हां दिसली का
लक्ष्मीहि तुम्हां दिसली का
पावित्र्याचा॥ उगवला....॥

दुंदुभी नभी दुमदुमली
माणिकमोती उधळिली
स्वातंत्र्यदेवता आली
जयघोषाचा॥ उगवला....॥

सर्वैक्य-सुंदरासन
मांडिले बहुत सजवून
देवता दिसतसे खुलुन
मोक्षश्रीचा॥ उगवला....॥

सुखसिंधु किति उचंबळे
भाग्यात चित्त दंगले
मोदात विश्व रंगले
कैवल्याचा॥ उगवला....॥

-अमळनेर छात्रालय, १९२८

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP