मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
मम जीवन हरिमय होऊ दे हरिम...

मम जीवन हरिमय होऊ दे! - मम जीवन हरिमय होऊ दे हरिम...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


मम जीवन हरिमय होऊ दे
हरिमय होवो
प्रभुमय होवो
हरिशी मिळून मज जाऊ दे ॥ मम.... ॥

रुसेन हरिशी
हसेन हरिशी
हरिभजनी मज रंगू दे ॥ मम.... ॥

गाईन हरिला
ध्याइन हरिला
भवसागर मज लंघू दे ॥ मम.... ॥

हरिनामाचा
पावक साचा
अघवन घन मम जळू दे ॥ मम.... ॥

हेत हरीचे
बेत हरीचे
सकल कृतींतून दावू दे ॥ मम.... ॥

वेड सुखाचे
लागो हरिचे
हरिशी मिळून मज जाऊ दे ॥ मम.... ॥

-धुळे तुरुंग, जून १९३४

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP