मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
मन माझे सुंदर होवो वरी जा...

मन माझे सुंदर होवो - मन माझे सुंदर होवो वरी जा...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


मन माझे सुंदर होवो
वरी जावो
हरी गावो
प्रभुपदकमली रत राहो ॥ मन.... ॥

द्वेषमत्सरा न मिळो अवसर
कामक्रोधा न मिळो अवसर
निष्पाप होउनी जावो ॥ मन.... ॥

प्रेमपूर हृदयात भरू दे
भूतदया हृदयात भरू दे
शम, समता, सरिता वाहो ॥ मन.... ॥

पावित्र्याचे वातावरण
चित्ताभोवति राहो भरून
कुविचार-धूलि ना येवो ॥ मन.... ॥

आपपर असा न उरो भाव
रंक असो अथवा तो राव
परमात्मा सकळी पाहो ॥ मन.... ॥

धैर्य धरू दे, त्यागा वरु दे
कष्टसंकटां मिठी मारु दे
आलस्य लयाला जावो ॥ मन.... ॥

अशेचा शुभ दीप जळू दे
नैराश्याचे घन तम पळू दे
मनि श्रद्धा अविचल राहो ॥ मन.... ॥

सत्याची मज सेवा करु दे
सत्यास्तव मज केवळ जगु दे
सत्यात स्वर्ग मम राहो ॥ मन.... ॥

करुनी अहर्निश आटाआटी
ध्येयदेव गाठायासाठी
हे प्राण धावुनी जावो ॥ मन.... ॥

-धुळे तुरुंग, जून १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP