मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
अति आनंद हृदयी भरला प्रिय...

अति आनंद हृदयी भरला - अति आनंद हृदयी भरला प्रिय...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


अति आनंद हृदयी भरला
प्रियकर प्रभु मम हृदयी आला
शोक पळाला
खेद गळाला
पापताप दूरी झाला ॥अति.... ॥

मम तनमनधन
मम हे जीवन
अर्पिन पदकमला ॥अति.... ॥

चिंता सरली
भीती नुरली
त्रास सकळ सरला ॥अति.... ॥

प्रेमरज्जुने
प्रभुला धरणे
जाईन मग कुठला ॥अति.... ॥

-धुळे तुरुंग, मे १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP