मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
जरि वाटे भेटावे प्रभुला ड...

श्रमाची महती - जरि वाटे भेटावे प्रभुला ड...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


जरि वाटे भेटावे
प्रभुला डोळ्यांनी देखावे ॥ जरि.... ॥

श्रम निशिदिन तरि बापा!
सत्कर्मी अनलस रंगावे ॥ जरि.... ॥

प्रभु रात्रंदिन श्रमतो
विश्रांतीसुख त्या नच ठावे ॥ जरि.... ॥

प्रभुला श्रम आवडतो
जरि तू श्रमशिल तरि तो पावे ॥ जरि.... ॥

पळहि न दवडी व्यर्थ
क्षण सोन्याचा कण समजावे ॥ जरि.... ॥

सत्कर्मांची सुमने
जमवुन प्रभुपद तू पुजावे ॥ जरि.... ॥

रवि, शशि, तारे, वारे
सागर, सरिता, श्रमति बघावे ॥ जरि.... ॥

सेवेची महती जाणी
कष्टांची महती जाणी
कष्टुनिया प्रभुपद गाठावे ॥ जरि.... ॥

-धुळे तुरुंग, मे १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP