मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी| मला तुझ्यावीण कुणी कुणी न... साने गुरूजी अनंत आई झगडे मनात उसंत ना... हृदय मदीय तव सिंहासन होवो... प्रभुवर मजवर कृपा करावी म... एक किरण मज देई केवळ एक कि... माझी बुडत आज होडी मज कर ध... अति आनंद हृदयी भरला प्रिय... मम जीवन हरिमय होऊ दे हरिम... मजला तुझ्यावीण जगी नाही क... तव अल्प हातून होई न सेवा ... सदयहृदय तू प्रभु मम माता ... दिसतात सुखी तात! सारेच लो... देवा! धाव धाव धाव या कठिण... दु:ख मला जे मला ठावे मदश्... नयनी मुळी नीरच नाही करपून... मी प्रभुराया! त्वदंगणांती... प्रभु! जन्म सफल हा व्हावा... येइ ग आई मज माहेराला नेई ... येतो का तो दुरून बघा तरि,... पूजा मी करु रे कैशी? येशी... पूजा करिते तव हे, प्रभुवर... आम्ही देवाचे मजूर आम्ही द... जरि वाटे भेटावे प्रभुला ड... मन माझे सुंदर होवो वरी जा... काय करावे? मी केवळ मरुनी ... असो तुला देवा! माझा सदा न... प्रभो! काय सांगू तुला मी ... हृदयंगम वाजत वेणू स्वैर न... मनमोहना! भवमोचना! भूक लाग... बाल्यापासुन हृदयात बसुन ग... हृदयाकाशी मेघराशी आल्या क... देवा! झुरतो तव हा दास करि... प्रभु! सतत मदंतर हासू दे ... जागृत हो माझ्या रामा! हे ... हे नाथ! येईन तव नित्य काम... हे तात! दे हात करुणासमुद्... तुजवीण अधार मज कोणि नाही काही कळेना, काही वळेना।। ... आई! आई! तू मज मार मार।। ... दिव्य आनंद मन्मना एक गोवि... पडला हा अंधार कैसे लावियल... वारा वदे कानामधे गीत गाइन... होतो मी कासावीस। झुरतो मी... काय सांगू देवा, कोणा सांग... असो तुला देवा माझा सदा नम... गाडी धीरे धीरे हाक। बाबा ... पतीत खिन्न अति दु:खी उदास... ध्येयहीन कर्महीन शक्तिहिन... फुलापरी दंवापरी हळु मदीय ... हे शरणामतजन-करुण! दाखव मज... नवजीवन-प्रदाता। चैतन्य ओत... करीन सेवा तव मोलवान। असो ... खरोखरी मी न असे कुणी रे। ... रडण्याचे ध्येय भरला हा अंधार। सारा भरला ... सरला घन अंधार। आला प्रकाश... हे सुंदरा अनंता! लावण्यके... अनंत दिधली ही वसुंधरा घर ... मला हसता का? हसा हसा सारे... अनंत दिधली ही वसुंधरा घर ... किती धडपडलो किती भागलो मी... तुझ्याविणे कोणि न माते वत... तृणास देखून हसे कुरंग। मर... कळ्या जळीवीण कशा फुलाव्या... जीवनाच्या ओसाड वाळवंटी। क... संपोनीया निशा। उजळते प्रभ... जन्ममरणांची। पाउले टाकीत ... उदास झालो त्या दिवशी। निर... माझ्या ओठावरि थरथरे प्रार... पुशी अहंता निज पापमूळ। खर... प्रकाश केव्हा भवनी भरेल? मला तुझ्यावीण कुणी कुणी न... जीवनसुमना मदीय देवा! त्वच... सदा राम गुंफिन कारुण्यवसंता रामा। तुजसाठ... अहा चित्त जाई सदा हे जळून... प्रभु माझी जीवनबाग सजव।। ... अनुताप- आसवांनी। कासार मा... तळमळतो रे तुझा तान्हा।। क... नाशी मोह प्रभुजि अथवा प्र... कधि येशिल हृदयि रघुराया क... मम हातांनी काहि न होइल का... नको माझे अश्रु हाचि थोर ठ... ‘जग हे मंगल म्हणे मदंतर ‘... प्रभु मम हृदयि आज येणार! ... फुलापरी या जगात सुंदर एक ... मम दृष्टीला भेसुर दिसते भ... खरा तो एकची धर्म। जगाला प... असे का जीवनी अर्थ? असे रे... आयुष्याच्या पथावर। सुखा न... विशुद्ध मत्स्वांत सदैव रा... भरो विश्वात आनंद। शांती न... काय करावे मी मेघासम विचरा... मी वंदितो पदरजे विनये तया... विशुद्ध भाव अंतरी कृती उद... उत्साहसिंधु थोर। चित्तात ... करुन माता अनुराग राग। विक... कर्तव्याला करित असता दु:ख... हिंदू आणिक मुसलमान ते भां... तीन वर्षांचा बाळ गोड आला।... दु:खाला जे विसरवनिया दिव्... नूतन संवत्सर आला। मोद मना... मकर-संक्रांत सुखाच्या सुक... होतो मी लहान आनंदाने मनी ... असे माझा मित्र हो लहान। त... काय मी रे करू देवा आळविले... अद्याप पातकाने। नाहीच स्प... शस्त्रास्त्रांनी सुटती न ... रवि मावळला, निशा पातली, श... “चिरमित्र सखा सहोदर मम तू... बा नीज, सख्या! नीज गड्या ... आत्मा ओत रे ओत निर्मावा द... निरोप धाडू काय तुला मी बा... हे भारतमाते मधुरे! गाइन स... मनमोहन मूर्ति तुझी माते स... एक मात्र चिंतन आता एकची व... प्रभु! भारतिचे वैभव कोठे ... स्वातंत्र्याचे अम्ही शिपा... अम्ही मांडू निर्भय ठाण। द... धैर्यमूर्ति उज्ज्वलकीर्ती... प्रिय भारतभू-सेवा सतत करु... झापू नको झणि ऊठ रे पाहे स... बलसागर भारत होवो विश्वात ... भूषण जगताला होइल, भूषण जग... भारतजननी सुखखनि साजो तद्व... हृदय जणु तुम्हां ते नसे।।... माझ्या महाराष्ट्रभूमीत मो... भारतमाता माझी लावण्याची ख... मरणही ये तरी वरिन मोदे जन... ध्येय देईन दिव्य मी स्वर्... देश आमुचा वैभवशाली वाली स... उत्साही मुखमंडले भुजगसे द... नाही आता क्षणहि जगणे भारत... प्रिय भारता सुंदरा!।। ज्ञ... दुबळी मम भारतमाता दीन विक... सन्मित्रांनो! सुबांधवांनो... हे शुभकीर्ते जगद्विश्रुते... हे जीवन केविलवाणे। गाऊ मी... प्राण अर्पावे। स्वातंत्र्... आनंदाचा। उगवला दिवस सोन्य... मंगल मंगल त्रिवार मंगल पा... मनोहरा भारता! मदंतर देवा!... ऊठ ऊठ, भारता! तू ऊठ उज्वल... वंदे मातरम् वंदे मातरम् व... भारतजननी तव शरणम्। भारतमा... अन्यां करील जगती निज जो ग... सत्याचा जगतात खून करिती, ... उज्वला! निर्मला हे भारतवर... करुणाघन अघशमन मंगला जनार्... राष्ट्रीय जीवन ओसाड मैदान... करु वंदना प्रभाती। करु की... ऊठा बंधुनो! प्रभात झाली झ... हसो दिवस वा असो निशा ती। ... शाळा सुटली कटकट मिटली बाळ... मातृभूमि! माझ्या चित्ता ए... अजि घुमघुमली स्वतंत्रतेची... भारतात या नसे मुलांचा तोट... महाराष्ट्रा! ऊठ दष्ट्रा श... स्वातंत्र्यसूर्य राणा। चि... विश्वाला दिधला तुम्हीच भग... मी मांडितसे विचार साधे सर... सत्याग्रही या नावाचे एक ख... हृदयाचे बोल - मला तुझ्यावीण कुणी कुणी न... साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने Tags : marathipoemsane gurujiकविताकाव्यमराठीसाने गुरूजी हृदयाचे बोल Translation - भाषांतर मला तुझ्यावीण कुणी कुणी न। खरोखरी मी तुजवाण दीननसेच आधार मला कुणाचा। मला विसावा पद- सारसाचा॥सख्या जिवाचा मम आसरा तू। उदार माता मज वासरा तूगड्या दिलाचा मम दिलरुबा तू। म्हणेन मी संतत एक तू तू॥मदीय तू बोध मदीय मोद। मदीय चित्ता प्रभु! तू विनोदमदीय संगीत मदीय गान। त्वमेक रे जीवन मामकीन॥मदीय तू खान मदीय पान। मदीय तू स्थान मदीय मानमदीय तू सौख्य मदीय ठेवा। तुझ्याविणे काहि न देवदेवा॥तुझाच आधार तुझा विसावा। तुझाच हे तात! करीन धावातुलाच मारीन सदैव हाका। कृपांबराने निज बाळ झाका॥तुझ्यावरी सर्व मदीय भार। तुझ्यावरी सर्व सख्या मदारतुझेच माते जरि बंद दार। मदीय दु:खास न अंत पार॥तुझ्यावरी सर्व उड्या मदीय। सख्या जरि प्रेम नुरे त्वदीयतरी न सत्कर्म घडेल हाती। समस्त हे जीवन होइ माती॥न जीव पंखाविण पाखरास। न आस गायीविण वासरासपतंग सूत्राविण ना तरंगे। तुझ्याविणे दास तुझा न रंगे॥न मूल हासे जरि अंबिका न। चकोर दु:खी जरि चंद्रिका नवने वसंताविण हासती न। तुझ्याविण दास तुझा सुदीन॥सुचे वसेताविण ना पिकाला। सुके जरी पाऊस ना पिकालाजळाविणे जाइ जळून मीन। सुके तसा दास भवद्विहीन॥अनाथनाथा! उघडा जगात। दरिद्र दु:खी पडलो पथातमदीय तू लाज न राखशील। तरी निज ब्रीद गमावशील॥सख्या अनंता करुणावसंता। तुझ्याविणे कोण कलंकहंतामदीय मालिन्य धुवावयाते। तुझ्याविणे कोण समर्थ माते॥करी तुझे मूल धुवून नीट। करी मुलाला शिकवून धीटतदीय घे हात तुझ्या करोत। पडेल ना तो न घडेल घात॥असो तुझा हात मदीय माथा। न दूर लोटी मज दीननाथामदंतरंगी करुनी निवास। सुवास द्यावा मम जीवनास॥दिला कशाला नरजन्म माते। जरी न तत्सार्थक होइ हातेदिली कशाला तनु मानवाची। जरी असे वृत्ति सदा पशूची॥ ==अमोल मोती मजला दिलेस। धुळीत मी मेळविले तयासअयोग्य हाती बहुमोल ठेवा। दिला किमर्थ प्रभु देवदेवा॥अमोल लाभे नरजन्म देवा। परी घडेना तव अल्प सेवाकशी तुला ही नरजन्ममाती। पहावते? सांग, जयास गाती॥मलाच ठावी मम वेदना रे। न कल्पना येइल ती परा रेकिमर्थ मी ढाळित आसवांते। तुलाहि माहित नसेल का ते?॥अनाथ दोषी दुबळा गरीब। सदैवत्याचे रडणे नशीबन देव ना मानव त्या न कोणी। सदा रडावे तिमिरी बसोनि॥सकाळ होवो अथवा दुपार। प्रभात किंवा रजनी गंभीरमला असे एकच काम साचे। अखंडनेत्राश्रुविमोचनाचे॥रडून रात्रंदिन दोन्हि डोळे। फुटून जावोत बनोत गोळेतुला नसे भाग्य बघावयाचे। नुरे तरी कामच लोचनांचे॥परोपरी मी तुज आळवीन। सदैव गीते रचुनी नवीनतुझी घडो भेट न वा घडो रे। मुळी तुझे गीत तरी असो रे॥मुखी असो नाम तरी निदान। तयास मी मानिन मन्निधानन आठवी माय जरी मलास। न बाळ केव्हा विसरेल तीस॥कितीहि झाले जरि खोडसाळ। तरी उराशी धरि माय बाळमदीय माता परि फार मानी। न पुत्रहाका परिसे हि कानी॥सदैव माता जपती मुलांना। सदैव माद्या जपती पिलांनाजगात माता विसरेल बाळ। तरी जगाचा जवळीच काळ॥मला न पोटी धरिशील आई। मला न नेत्री बघशील आईकशास हा जन्म तरी दिलास। मला अहोरात्र रडावयास॥न आत्महत्या करण्यास वीर। जरी बघाया तुजला अधीरन रोगही मित्र बनेल पाही। न देव त्याला जगि कोणि नाही॥रडे रडे सतत तू रडे रे। न जोवरी त्वत्तनु ही पडे रेरडावयाचाचि तुझा स्वधर्म। रडावयाचे करि नित्य कर्म॥निराश होतो बनतो भ्रमिष्ट। विनिंदतो व्यक्ति जगद्-गरिष्ठसमस्त माते हसतात लोक। कुणा कळे आंतर आइ! शोक॥असाच हा चंचल दुर्विचार। वदून ते हासती सान-थोरतुझ्या मुलाची करिती टवाळी। मुका बिचारा परि अश्रु ढाळी॥अनंत आनंद तुझ्या जगात। न मी रडावे कधिही मनातसदैव देवा मजला हसू दे। कधी उदासीन न रे बसू दे॥हसे सदा मद्वदनी असावे। मदास्य हे खिन्न कधी नसावेअसे जरी वाटतसे मनात। सदा उभे अश्रुच लोचनात॥भरुन येती मम नेत्र देवा। मला कळेना मम पापठेवामला न तत्कारण ते कळेना। मदश्रुधारा कधिही सरेना॥वसंत येई पिक गोड गाई। वनस्थली रम्य सजून राहीफुलाफळांना प्रभु ये बहार। मदीय नेत्री परि अश्रुधार॥शरद ऋतू ये सुखद प्रसन्न। धरा सधान्या सरिता प्रसन्नप्रसन्न आकाश प्रसन्न तारे। मदीय नेत्री परि अश्रु बा रे॥विषाद जाऊन विकास येवो। अकर्मता जाउन कर्म येवोनिशा सरोनी हसु दे उषेला। वरो सदा मन्मन जागृतीला॥सरोनी अंधार उजेड येवो। निबद्ध माझी मति मुक्त होवोस्वतंत्रतेच्या गगनी उडू दे। विचारनक्षत्रफुले खुडू दे॥कधी न आता प्रभु मी रडावे। विशंक उत्साहभरे उडावेस्वपंख आनंदुन फडफडावे। वरीवरी सतत मी चढावे॥सदैव उत्साह असो मनात। सदैव सेवा असु दे करांतअसो सदा शांति मदंतरात। भरुन राही मम जीवनात॥अखंड आकर्षुनिया ग्रहांस। सभोवती नाचवि त्या दिनेशपदांबुजाभोवती इंद्रियांस। धरुनिया लावि फिरावयास॥प्रदक्षिणा ती तुजला करोत। तव प्रकाशे विमल नटोतहरेल अंधार सरेल रात्र। तुझ्या प्रसादा बनतील पात्र॥सुचो रुचो ना तुजवीण काही। जडो सदा जीव तुझ्याच पायीतुझाच लागो मज एक छंद। मुखात गोविंद हरे मुकुंद॥ ==तुझाच लागो मज एक नाद। सरोत सारेच वितंडवादतुझा असो प्रेमळ एक बंध। मुखात गोविंद हरे मुकुंद॥अनंत हे अंबर नीलनील। उभे न मागे जरि का असेलतरी न ताराद्युति ती खुलेल। सुपार्श्वभूमी चढवीत मोल॥समस्त मागे कृतिच्या मदीय। असो भवन्मूर्ति विलोभनीयसमस्त कर्मे पदकासमान। तुझ्या शुभांगी झळकोत छान॥शुभकृतीची मम वजयंती। गळा तुझ्या घालिन भूषयन्तीउरी तुझ्या सुंदर ती रुळेल। बघून त्वन्नेत्रनदी निघेल॥मनोज्ञपुष्पासम गंधवंत। पवित्र तारांपरि दीप्तिमंतसुरम्य मोत्यांपरि पाणिदार। असा कधी अर्पिन कर्महार॥नसे मला ज्ञान खरी न भक्ति। नसे मला योग न ती विरक्तिनसे तपस्या पदरात जाड। तरी तुझी मी करितोच चाड॥कधी मदश्रु प्रभुजी पुसाल। कधी निजांकी निजबाळ घ्यालतुम्हास मी मानित मायबाप। कधी बरे दूर कराल ताप॥जरी मुलाला ढकलाल आज। जरी न राखाल तदीय लाजजरी न पाजाल अनंत पान्हा। जगेल ना तो तरि दीन तान्हा॥-नाशिक तुरुंग, मे १९३३ N/A References : N/A Last Updated : April 16, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP