मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
असो तुला देवा! माझा सदा न...

नमस्कार - असो तुला देवा! माझा सदा न...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


असो तुला देवा! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाहि पार ॥ असो.... ॥

तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतिल मोति मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतिल सर्प रम्य हार
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार ॥

तुझ्या कृपेने रे होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने रे होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने रे होइल पंगु सिधुपार
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार ॥

तुझ्या कृपासिंधूमधला बिंदु जरि मिळेल
तरि प्रभो! शतजन्मांची मत्तृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो राया! बघत बघत दार
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार ॥

-धुळे तुरुंग, मे १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP