मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
येतो का तो दुरून बघा तरि,...

येतो का तो दुरून - येतो का तो दुरून बघा तरि,...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


येतो का तो दुरून
बघा तरि, येतो का तो दुरून ॥

येतो का मम जीवनराजा
येतो का मम अंतरराजा
कंठ येइ गहिवरून ॥ बघा तरि.... ॥

केवळ त्याच्यासाठी जगलो
केवळ त्याच्यासाठी उरलो
हृदय येतसे भरून ॥ बघा तरि.... ॥

वाट बघोनी त्याची सतत
रडुनी रडुनी निशिदिन अविरत
डोळे गेले सुजून ॥ बघा तरि.... ॥

येईल केव्हा माझा जिवलग
मम हृदयाची होई तगमग
जीव जातसे झुरून ॥ बघा तरि.... ॥

येतांची मम जीवन राणा
ओवाळून मी पंचप्राणा
टाकिन त्याचेवरून ॥ बघा तरि.... ॥

जीवनवल्लभ पडता दृष्टी
धावत जाउन घालिन दृढ मिठी
जाइन तत्पदि मरून ॥ बघा तरि.... ॥

-धुळे तुरुंग, एप्रिल १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP