मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
अनंत आई झगडे मनात उसंत ना...

श्रीराम - अनंत आई झगडे मनात उसंत ना...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने

अनंत आई झगडे मनात
उसंत ना संतत चालतात
किती निराश किति थोर आशा
किती मनी चालतसे तमाशा ॥

कसे तुला दावु समस्त माते
अशक्य ते या दुबळ्या मुलाते
परी कळावी तुज मन्मनाची
स्थिती, अशी आस तुझ्या मुलाची ॥

म्हणून जो हा हृदयात सिंधु
उचंबळे, त्यातिल एक बिंदु
समर्पितो ठेवून नाम पत्री
तुझ्या महोदर पदी पवित्री ॥

पुणे, २८-२-२५                   -पां. स. साने

N/A

References : N/A
Last Updated : April 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP