मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
आई! आई! तू मज मार मार।। ...

आईचा मार - आई! आई! तू मज मार मार।। ...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


आई! आई! तू मज मार मार॥

मारुन मारुन मजला रडवी
चाबुक उडवुन रक्ता उडवी
लावी मन्नयनांस धार॥ आई....॥

लाल तुझ्या परि दृष्टीखाली
प्रेमसुधेची गंगा भरली
दिसते गे अपरंपार॥ आई....॥

मारुन मारुन तूची रडशिल
जवळी ओढुन मजला घेशिल
तुज दु:ख होईल फार॥ आई....॥

माडीवरती मज बसवशिल
हनुवट धरुनी मज हसवशिल
घेशिल मुके वारंवार॥ आई....॥

प्रेमे तुजला मी बिलगेन
तव अश्रूंचे मजला स्नान
हरपेल मम दु:खभार॥ आई....॥

आई! तुझा मज रुचतो मार
त्याहुन नाहि दुजे मज प्यार
मारुन मारुन तार
मारुन करि उद्धार॥ आई....॥

-धुळे तुरुंग, मे १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP