मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी| उदास झालो त्या दिवशी। निर... साने गुरूजी अनंत आई झगडे मनात उसंत ना... हृदय मदीय तव सिंहासन होवो... प्रभुवर मजवर कृपा करावी म... एक किरण मज देई केवळ एक कि... माझी बुडत आज होडी मज कर ध... अति आनंद हृदयी भरला प्रिय... मम जीवन हरिमय होऊ दे हरिम... मजला तुझ्यावीण जगी नाही क... तव अल्प हातून होई न सेवा ... सदयहृदय तू प्रभु मम माता ... दिसतात सुखी तात! सारेच लो... देवा! धाव धाव धाव या कठिण... दु:ख मला जे मला ठावे मदश्... नयनी मुळी नीरच नाही करपून... मी प्रभुराया! त्वदंगणांती... प्रभु! जन्म सफल हा व्हावा... येइ ग आई मज माहेराला नेई ... येतो का तो दुरून बघा तरि,... पूजा मी करु रे कैशी? येशी... पूजा करिते तव हे, प्रभुवर... आम्ही देवाचे मजूर आम्ही द... जरि वाटे भेटावे प्रभुला ड... मन माझे सुंदर होवो वरी जा... काय करावे? मी केवळ मरुनी ... असो तुला देवा! माझा सदा न... प्रभो! काय सांगू तुला मी ... हृदयंगम वाजत वेणू स्वैर न... मनमोहना! भवमोचना! भूक लाग... बाल्यापासुन हृदयात बसुन ग... हृदयाकाशी मेघराशी आल्या क... देवा! झुरतो तव हा दास करि... प्रभु! सतत मदंतर हासू दे ... जागृत हो माझ्या रामा! हे ... हे नाथ! येईन तव नित्य काम... हे तात! दे हात करुणासमुद्... तुजवीण अधार मज कोणि नाही काही कळेना, काही वळेना।। ... आई! आई! तू मज मार मार।। ... दिव्य आनंद मन्मना एक गोवि... पडला हा अंधार कैसे लावियल... वारा वदे कानामधे गीत गाइन... होतो मी कासावीस। झुरतो मी... काय सांगू देवा, कोणा सांग... असो तुला देवा माझा सदा नम... गाडी धीरे धीरे हाक। बाबा ... पतीत खिन्न अति दु:खी उदास... ध्येयहीन कर्महीन शक्तिहिन... फुलापरी दंवापरी हळु मदीय ... हे शरणामतजन-करुण! दाखव मज... नवजीवन-प्रदाता। चैतन्य ओत... करीन सेवा तव मोलवान। असो ... खरोखरी मी न असे कुणी रे। ... रडण्याचे ध्येय भरला हा अंधार। सारा भरला ... सरला घन अंधार। आला प्रकाश... हे सुंदरा अनंता! लावण्यके... अनंत दिधली ही वसुंधरा घर ... मला हसता का? हसा हसा सारे... अनंत दिधली ही वसुंधरा घर ... किती धडपडलो किती भागलो मी... तुझ्याविणे कोणि न माते वत... तृणास देखून हसे कुरंग। मर... कळ्या जळीवीण कशा फुलाव्या... जीवनाच्या ओसाड वाळवंटी। क... संपोनीया निशा। उजळते प्रभ... जन्ममरणांची। पाउले टाकीत ... उदास झालो त्या दिवशी। निर... माझ्या ओठावरि थरथरे प्रार... पुशी अहंता निज पापमूळ। खर... प्रकाश केव्हा भवनी भरेल? मला तुझ्यावीण कुणी कुणी न... जीवनसुमना मदीय देवा! त्वच... सदा राम गुंफिन कारुण्यवसंता रामा। तुजसाठ... अहा चित्त जाई सदा हे जळून... प्रभु माझी जीवनबाग सजव।। ... अनुताप- आसवांनी। कासार मा... तळमळतो रे तुझा तान्हा।। क... नाशी मोह प्रभुजि अथवा प्र... कधि येशिल हृदयि रघुराया क... मम हातांनी काहि न होइल का... नको माझे अश्रु हाचि थोर ठ... ‘जग हे मंगल म्हणे मदंतर ‘... प्रभु मम हृदयि आज येणार! ... फुलापरी या जगात सुंदर एक ... मम दृष्टीला भेसुर दिसते भ... खरा तो एकची धर्म। जगाला प... असे का जीवनी अर्थ? असे रे... आयुष्याच्या पथावर। सुखा न... विशुद्ध मत्स्वांत सदैव रा... भरो विश्वात आनंद। शांती न... काय करावे मी मेघासम विचरा... मी वंदितो पदरजे विनये तया... विशुद्ध भाव अंतरी कृती उद... उत्साहसिंधु थोर। चित्तात ... करुन माता अनुराग राग। विक... कर्तव्याला करित असता दु:ख... हिंदू आणिक मुसलमान ते भां... तीन वर्षांचा बाळ गोड आला।... दु:खाला जे विसरवनिया दिव्... नूतन संवत्सर आला। मोद मना... मकर-संक्रांत सुखाच्या सुक... होतो मी लहान आनंदाने मनी ... असे माझा मित्र हो लहान। त... काय मी रे करू देवा आळविले... अद्याप पातकाने। नाहीच स्प... शस्त्रास्त्रांनी सुटती न ... रवि मावळला, निशा पातली, श... “चिरमित्र सखा सहोदर मम तू... बा नीज, सख्या! नीज गड्या ... आत्मा ओत रे ओत निर्मावा द... निरोप धाडू काय तुला मी बा... हे भारतमाते मधुरे! गाइन स... मनमोहन मूर्ति तुझी माते स... एक मात्र चिंतन आता एकची व... प्रभु! भारतिचे वैभव कोठे ... स्वातंत्र्याचे अम्ही शिपा... अम्ही मांडू निर्भय ठाण। द... धैर्यमूर्ति उज्ज्वलकीर्ती... प्रिय भारतभू-सेवा सतत करु... झापू नको झणि ऊठ रे पाहे स... बलसागर भारत होवो विश्वात ... भूषण जगताला होइल, भूषण जग... भारतजननी सुखखनि साजो तद्व... हृदय जणु तुम्हां ते नसे।।... माझ्या महाराष्ट्रभूमीत मो... भारतमाता माझी लावण्याची ख... मरणही ये तरी वरिन मोदे जन... ध्येय देईन दिव्य मी स्वर्... देश आमुचा वैभवशाली वाली स... उत्साही मुखमंडले भुजगसे द... नाही आता क्षणहि जगणे भारत... प्रिय भारता सुंदरा!।। ज्ञ... दुबळी मम भारतमाता दीन विक... सन्मित्रांनो! सुबांधवांनो... हे शुभकीर्ते जगद्विश्रुते... हे जीवन केविलवाणे। गाऊ मी... प्राण अर्पावे। स्वातंत्र्... आनंदाचा। उगवला दिवस सोन्य... मंगल मंगल त्रिवार मंगल पा... मनोहरा भारता! मदंतर देवा!... ऊठ ऊठ, भारता! तू ऊठ उज्वल... वंदे मातरम् वंदे मातरम् व... भारतजननी तव शरणम्। भारतमा... अन्यां करील जगती निज जो ग... सत्याचा जगतात खून करिती, ... उज्वला! निर्मला हे भारतवर... करुणाघन अघशमन मंगला जनार्... राष्ट्रीय जीवन ओसाड मैदान... करु वंदना प्रभाती। करु की... ऊठा बंधुनो! प्रभात झाली झ... हसो दिवस वा असो निशा ती। ... शाळा सुटली कटकट मिटली बाळ... मातृभूमि! माझ्या चित्ता ए... अजि घुमघुमली स्वतंत्रतेची... भारतात या नसे मुलांचा तोट... महाराष्ट्रा! ऊठ दष्ट्रा श... स्वातंत्र्यसूर्य राणा। चि... विश्वाला दिधला तुम्हीच भग... मी मांडितसे विचार साधे सर... सत्याग्रही या नावाचे एक ख... प्रेम का करावे? - उदास झालो त्या दिवशी। निर... साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने Tags : marathipoemsane gurujiकविताकाव्यमराठीसाने गुरूजी प्रेम का करावे? Translation - भाषांतर उदास झालो त्या दिवशी। निराश वाटे फार मनीकष्टी झालो मनात मी। बुडतो वाटे घोर तमीसभोवती भरे अंधार। दिसे न कोठे आधारभोजनावरी नसे मन। दुस-यांस्तव परि जाऊनदोन घास ते कसे तरी। खावून गेलो बाहेरीहोते रडवेले वदन। होते पाणरले नयनसायंवेळा ती झाली। प्रभा न धरणीवर उरलीप्रभा न उरली हृदयात। शिरते हृदयी घन रात्रमदीय मृदु हळु हृदयात। वाटे कुणि मज न जगातप्रेम जयांचेवरि केले। डोळ्यांपुढती ते आलेडोळ्यांपुढती त्या मूर्ती। क्षणात सुंदर अवतरतीतनमन मी ज्या दिधले। समोर सगळे ते आलेयदर्थ डोळे मम रडले। यदर्थ देवा आळविलेज्यांच्या हितमंगलास्तव। प्रेमे रडला मम जीवमदीय सुंदर जे काही। जयांस दिधले सदैवहीस्मृती तयांची मदंतरी। आली एकाएकि खरीअसेल का मत्स्मृति त्यांना। येइल जल का तन्नयनादिसेल का मन्मूर्ति तया। गहिवर येइल का हृदयाविसरलेच ते असतील। उठे असा मन्मनि बोलमदर्थ ना कुणी रडतील। मदर्थ ना कुणी झुरतीलमला न कोणी स्मरतील। मला न कोणी लिहितीलकशास लिहितिल मी कोण। कोण्या झाडाचे पानअसे जवळ तरि ते काय। केवळ आहे हे हृदयविशाल बुद्धि न मज काहि। स्वयंप्रज्ञता ती नाहीविद्या नाही कला नसे। अभिमानी जग मला हसेकशात नाही पारीण। जगात दिसतो मी दीनधैर्य धडाडी ती नाही। सदैव मागे मी राहीशरीरसौष्ठव ते नाही। घरदार मला ते नाहीपैसा अडका ना एक। जगात केवळ कफल्लकभव्य भडक जे लखलखित। झगमगीत ते दिपवीतअसे न मजपाशी काही। मत्स्मृति कोणा कशि राहीकुणी स्मरावे का मजला। कुठल्या झाडाचा पालापरी मी तरी करु काय। आहे केवळ हे हृदयप्रेम त्यात जे मला मिळे। सदा जगाला ते दिधलेअसेच जे ना मजजवळी। द्याया ये ना कधिकाळीप्रेम मदंतरीचे दिधले। तुच्छ जगा परि ते दिसलेअसेल दोषी मत्प्रेम। असेन किंवा मी अधमप्रेमपूर जे मी दिधले। असेल विष ते त्या गमलेजगात मी तर कमनशिबी। धिक्कारी मज सृष्टी उभीप्रेम तरी मी का केले। स्वार्थे होते का भरले?प्रेमाचा तो मोबदला। हवा कशाला तरी मलाप्रेम जगाला दिल्याविना। जगी रहाया मज ये नाहृदय प्रेमे भरलेले। कळा लागती जरी न दिलेदेउ एकदा मी लागे। काहि न ठेवी मग मागेसर्वस्वा मी अर्पितसे। कोण परी हे जाणतसेमना! जगाचे पासून। व्यर्थ काय इच्छा करुनप्रेमाचा तो मोबदला। हवा कशाला बरे तुलादेत सदा रे तू राही। हृदय रिकामे जो होईविचार ऐसे हळुवार। मनात उडवित कल्लोळविचार कोमल मनि भरले। माझे मानस गजबजलेतुडुंब भरला हृदंबुधि। अगतिक वाटे मनामधीपाझरले हो मदंतर। डोळ्यां लागे जलधारमाझे भरलेले हृदय। भरलेले डोळे उभयभावनोत्कटा मदवृत्ती। गात्रे सगळी थरथरलीतो मार्गाने जात। ‘कुणी न मजला’ हे गाततोचि पाहिली समोर मी। फुले मनोहर अति नामीकाहि रुपेरी सोनेरी। विमल पाकळ्या एकेरीपरागपुंजासभोवती। सकळ पाकळ्या जपतातीपुंज मधोमध काळासा। नयनाममध्ये बुबुळ जसाजपति पापण्या बुबुळाला। तेवि पाकळ्या पुंजालाफुले न प्रेमे भरलेले। मजला गमले ते डोळेप्रेमाने ओथंबलेली। दृष्टी तयांची ती दिसलीसत्प्रेमाचे भरुन घडे। डोळे लावून जगाकडेहोति उभी ती गोड फुले। लक्ष जगाचे ना गेलेवाट पाहानी दिवसभरी। निराश झाली निजांतरीदृष्टी जराशी लवलेली। मला फुलांची ती दिसलीउघडे अद्यापी नयन। होते त्यांचे रसपूर्णउभा राहिलो तिथे क्षण। हृदय येउनी गहिवरुनप्रेम द्यावया जगाप्रती। होती उत्सुक फुले कितीप्रेम भरलेली दृष्टी। करिती मजवर ती वृष्टीप्रेमे भरली मनोहर। प्रेमे न्हाणिति मदंतरदिवसभर कुणी ना भेटे। आले गेले किति वाटेमला थांबता पाहून। त्यांचे आले मन भरुनडोलु लागली मोदाने। बोलु लागली प्रेमानेहोती तोवर फुले मुकी। वदती परि होऊन सुखीसहानुभूतीचा स्पर्श। उघडी त्यांच्या हृदयासबोलु लागली मजप्रती। गोड तरी ती गिरा किती‘दिले आमुचे प्रेम तुला। प्रेमतृषार्ता भल्या मुला!==प्रेम द्यावया आम्हि जगतो। देउन आनंदे मरतोफार अम्हा जरि न सुगंध। आहे त्यातच आनंदसदा मानितो, जे असते। जवळ, देतसे जगता तेदेण्यासाठी समुत्सुक। देण्यामध्ये खरे सुखकुणी न भेटले आम्हाला। खंत वाटली चित्तालादिवस संपुनी अंधार। पडू लागला बाहेरभरलेले प्रीतीचे घडे। रिते न झाले कुणापुढेभरलेले प्रीतीचे घडे। तसेच पडलेत बापुडेतशात तू आलास। प्रकाश जैसा अंधासतसे वाटले आम्हाला। मोद मनाला बहु झालायेऊन येथे रमलास। प्रेमे बघुनी आम्हांसघे तर सारे प्रेम तुला। प्रेमतृषार्ता भल्या मुलाघे सारे हे प्रेम तुला। प्रेम हवे ना तुला मुला’असे बोलुनी मज बघती। गोड मनोहर ती हसतीअमृतवृष्टिच जणु करिती। सुकलेल्या हृदयावरतीसुकून गेल्या शेतास। जसा मिळावा पाऊसतसे झाले मदंतरा। विसरुन गेलो जगा जराडोलु लागली फुले मुदे। वा-यावरती आनंदेयेई मदंतरही भरुन। पुढे ओढवुन मम वदनतयांस धरिले मी भाली। करी तयांना कुरवाळीधरिले प्रेमे हृदयाशी। प्रेमसिंधु त्या सुमनांसीपुन्हा बघतसे पुन्हा करी। हृदयी त्यांना घट्ट धरीअपार भरला आनंद। सकळ पळाला मत्खेददाउ कुणा हे रमणीय। दृश्य मनोहर कमनीयप्रसंग मोठा स्मरणीय। हृदयाल्हादक कवनीयतया फुलांना मी म्हटले। ‘तुम्ही मज किति तरि सुखवीलेविसावा तुम्ही मज दिधला। शोक तुम्ही मम घालविलामदीय डोळे हासविले। ओले होते जे झालेमदीय हृदया फुलवीले। होते कोमेजुन गेलेधरितो तुम्हां हृदयाशी। कृतज्ञता मी दावु कशीतुम्हास काव्यी गुंफीन। कृतज्ञता मी दावीनवदुनी धरिले हृदयाशी। जाणारे बघती मजसीमज वेड्याला ते हसले। लज्जेने क्षण मन भरलेफिरुन फुलांना पाहून। फिरुन एकदा हुंगूनफिरुन तया कुरवाळून। फिरुन हृदयाशी धरुननिघून गेलो तेथून। प्रेमाने ओथंबूनविचार आला मदंतरी। सृष्टिश प्रेम सदा वितरीमनुज देतसे प्रेमकण। परमेश्वर हे कोटिगुणसुमन तारका तरु वारि। प्रकाश-रुपे प्रकट हरीप्रेम देतसे सर्वांते। कळे न वेड्या जीवातेप्रकाशकिरण प्रेमाचे । भरलेले कर देवाचेकवटाळाया येतात। मोदप्रेमा देतातया वा-याच्या रुपाने। प्रभुच येतसे प्रेमानेअंगा प्रेमे स्पर्श करी। गुणगुण गाणे उच्चारीनद्या वाहती ज्या भव्य। प्रभुची करुणा ती दिव्यजिकडे तिकडे प्रेमाचा। पाउस पाडी प्रभु साचाअनंत देतो प्रेमास। कळे न वेड्या जीवासप्रभुचे प्रेम न बोलतसे। मुके राहुनी वर्षतसेप्रेम करो वा न करोत। अनंत हस्ते भगवंतप्रेम देतसे सकळांला। विचार हृदयी मम आलामला वाटली मग लाज। चित्तामाजी ता सहजप्रेम अगोदर देवाने। दिले तयास्तव मनुजानेकृतज्ञ राहुन आजन्म। द्यावे निरपेक्ष प्रेमभगवंताची ही पूजा। सदा जिवा रे करि माझ्यायातच सार्थक खरोखर। पुन्हा न मळवी निजांतरपुन्हा न केव्हा रड आता। प्रेम सर्वदा दे जगताप्रेम सदा तू देत रहा। प्रेमसिंधु तू होइ पहाप्रेमसागर प्रभुराज। प्रेम द्यावया ना लाजजगास द्यावे स्वप्रेम। हाच करी तू निजनेमजगास निरपेक्ष प्रेम। देणे हा करि निजधर्मसरोत दुसरे ते धर्म। प्रेमदान हे त्वत्कर्म-त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१ N/A References : N/A Last Updated : April 12, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP