मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
देवा! धाव धाव धाव या कठिण...

देवा! धाव धाव धाव - देवा! धाव धाव धाव या कठिण...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


देवा! धाव धाव धाव
या कठिणसमयी पाव ॥देवा.... ॥

अगणित रस्ते दिसती येथे
पंथ मजसि दाव ॥देवा.... ॥

अपार गोंधळ बघुनी विकळ
देई चरणी ठाव ॥देवा.... ॥

हा मज ओढी तो मज ओढी
करिती कावकाव ॥देवा.... ॥

कुणी मज रडवी कुणी मज चढवी
म्हणू कुणास साव ॥देवा.... ॥

घेऊनी जा मज प्रभु चरणी निज
नुरली कसली हाव ॥देवा.... ॥

-पुणे, ऑक्टोबर १९३४

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP