मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
नयनी मुळी नीरच नाही करपून...

नयनी मुळी नीरच नाही - नयनी मुळी नीरच नाही करपून...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


नयनी मुळी नीरच नाही
करपून किती मम अंतर जाई ॥ नयनी.... ॥

रडूनी रडूनी सरले पाणी
वदुनी वदुनी शिणली वाणी
आत जळत परि निशिदिन पाही ॥ नयनी.... ॥

रडता मी ना आता दिसतो
लोक सकळही परि हा फसतो
अश्रुविणे रडणे अति दाही ॥ नयनी.... ॥

खाई किडा तो आता कळीस
भ्रमर आत पोखरी काष्ठास
शोक तसा हृदयास सदाही ॥ नयनी.... ॥

अमृतधारा ये घेऊन तव
शोकानळ हा प्रभु झणि विझव
आस उरे तव केवळ आई ॥ नयनी.... ॥

-पुणे, ऑक्टोबर १९३४

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP