मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
तव अल्प हातून होई न सेवा ...

तव अल्प हातून होई न सेवा - तव अल्प हातून होई न सेवा ...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


तव अल्प हातून होई न सेवा
मम कंठ दाटे
किती खंत वाटे
हुरहूर वाटे अहोरात्र जीवा ॥ तव.... ॥

सेवा करावी
सेवा वरावी
मानी नित्य बोले असे फक्त देवा ॥ तव.... ॥

किती दु:ख लोकी
किती लोक शोकी
परि काही ये ना करायास देवा ॥ तव.... ॥

दिसता समोर
किती सानथोर
झटती, मला वाटतो नित्य हेवा ॥ तव.... ॥

हृदयात सेवा
वदनात सेवा
उतरे न हातात करु काय देवा ॥ तव.... ॥

खाणेपिणे झोप
मज वाटते पाप
वाटे सदा तात! की जीव द्यावा ॥ तव.... ॥

-पुणे, ऑक्टोबर १९३४

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP