मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
दृष्टांत

अर्थालंकार - दृष्टांत

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
बिंबप्रतिबिंबत्वे वर्णिति जैं भिन्न धर्म, दृष्टांत ॥
तूं कीर्तिमान्‍ नृपाला शशलांछनही असे द्युतीमंत ॥१॥

येथें कीर्ति व कांति ह्यांमध्यें मनोहारित्व -सादृश्यामुळें बिंबप्रतिबिंबभाव आहे.

श्लोक-
राजे असोतचि सहस्त्र दुजे धरा हे ॥
राजन्वती तरिच हा जरि भूप आहे ॥
नक्षत्रयुक्त दिसते रजनी तरी हे ॥
जोतिष्मती जरि मृगांक प्रकाशताहे ॥२॥
वाग्देवीस उपासती बहु परी सारांश सारस्वता ॥
विद्वद्रत्न मुरारि हा गुरुकुलीं झाला कवीं जाणता ॥
क्षीराब्धी जरि लंघिला कपिवरीं गांभिर्य जाणीतलें ॥
पातालावधिमग्नपरिवरतनू ऐशाच मंथाचलें ॥३॥

गद्य-
यांत जाणणें हा धर्म दोन्हींत एकच सांगितला आहे. ह्णणून प्रतिवस्तूपमेची शंका येईल पण तसें नव्हें. अचेतन जो मंथाचल
त्याचे ठिकाणीं जाणण्याचा धर्म राहणार कोठून ? यांत मंथराद्रीचें पातालापर्यंत जाणें मात्र दर्शविले आहे.

श्लोक-
केलेंस गर्वाभिमुखी मना तूं ॥ मेले अरी ते पुरलाहि हेतू ॥
अंधार राहे जंव सूय्र आला ॥ नाहीं असे तो उदयाचलाला ॥४॥
जो सुंदरी तुज दिवानिश ताप देतो ॥
जाळीच मत्तनु पुन्हां कुसुमेषु गे तो ॥
तेजें विहीन दिन जेंवि सुधाकराला ॥
तैसें करी नच कदांहि कुमुद्वतीला ॥५॥
शमवील कळीस साम रे हरि नादोंहि वळी ससा मरे ॥
अनलासहि कंप दे सती ॥ त्यज संरक्षिल संपदेस ती ॥६॥
श्री प्रियरामायण.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP