मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
तद्रूण

अर्थालंकार - तद्रूण

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
सोडुनी निगगुणासहि घे जरी । अन्यदीय गुण तद्रूण हो - तरी ॥
नासिकेंत सित मुक्त जरी असे । पद्मरागसम तें अधरें दिसे ॥१॥
तुझ्या वीर शत्रुस्त्रिया पल्लवातें । शिवोनी न घेतात नेसावयातें ॥
पडोनी नखाची रुची त्यावरी ते । तया भासती पांडुपत्रापरि ते ॥२॥
अंगा लग्न मृणालदंड गमतो भुंगे जसे बैसले ॥
नासामौक्तिक इंद्रनीलमणिसें श्वासानिलें जाहलें ॥
कर्पूरा जरि ठेविलें स्तनवटीं वाते तिला दीपसा ॥
पाणीही अटतें तसें करतलीं तप्तासयीं बिंदुसा ॥३॥

गद्य-
उल्लासालंकार व तद्रुण यामध्यें भेद इतकाच कीं, उल्लासालंकारांत गुण शब्द हा दोष शब्दाचा प्रतिपक्षी आहे; आणि तद्रुण अलंकारांतील  गुणशब्द रुप, रस, गंध, इत्यादि दर्शविणारा आहे.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP