मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
अनुज्ञा

अर्थालंकार - अनुज्ञा

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
गुणाचा जरी दोष वस्तूंत भासा असे दोष इच्छा अनुज्ञा तयास ॥
विपत्तीच राहोत ज्यामाजि नित्याहरीकीर्तनीं वेळ जाईल सत्य ॥१॥
गुणाचा भास जेव्हां दोशयुक्त वस्तूंत होतो आणि त्या गुणाचे योगानें
ती दोषयुक्त वस्तु असावीशी वाटते, तेव्हां हा अलंकार होतो.
जीर्णत्व पावोत कपीश्वरारे । जाले तुझे जे उपकार सारे ॥
फेडावयाला उपकार लोंकी । विपत्तिला इच्छिति हें विलोकी ॥२॥
तुझे नजिक बा फिरुं जरि पिशाचवृत्तीं धरुं ॥
शिवा अमरलोकिची कधिं न संपदा ते वरूं ॥
तुझें भवन देवडीवरिल सेवकीं भंगिलें ॥
असंख्य अमराधिपादिमुकुटां अह्मीं पाहिलें ॥३॥

आर्या-
भीम म्हणे दादाजी केली दुर्योधनें दया वाटे ॥
हे पाय पाहतों मी कैसें जरि लागतों न या वाटें ॥४॥
वनपर्व.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP