मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
तुल्ययोगिता

अर्थालंकार - तुल्ययोगिता

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


अनुष्टुप्‍-
वर्ण्यांच्या इतरांच्या वा धर्मैक्यीं तुल्ययोगिता ॥
कोमेजतात कमलें स्वैरिणी - वदनें तशीं ॥१॥
त्वदंग मृदु पाहोनी कोणाच्या मानसी न यें ॥
मालती- शशभू - ल्लेखा-कदलींची कठोरता ॥२॥
आर्या-करिवर - शुंडा मोठी परि कर्कश बहुत शैत्य कदलींत ॥
मांडयांस तीं उमेच्या उपमा द्याया न योग्य होतात ॥३॥

गद्य-
कमलें कोमेजतात व स्वछंदचारी स्त्रियांची वदनेंही कोमेजतात. येथें चंद्रोदय झाला हें दाखविण्याकरितां वरील गोष्टी वर्णन केल्या पाहिजेत; म्ह्णणून वर्णन केल्या आहेत. दुसरे श्लोकांत नायिकेचा सुकुमारपणा ण्याचीच जरुर असतां, ज्यांची जरुर नाहीं अशा मालती, चंद्रकला, व केळ यांचा कठोरपणा दाखविला आहे. तिसरे श्लोकांत पार्वतीचे मांडयांचें वर्णन कर्तव्य असतां, अप्रस्तुत जी गजशुंडा व केळ यांचा एक गुणाचा अन्वय केला आहे.

आर्या-
हितकर अहितकर अशा दोघांची वृत्ति सारखी तरि ती ॥
मित्रांना देशी तूं शत्रूंनाही नृपा परा-भूती ॥४॥

अनुष्टुप्‍ -
जो कापितो लिंबवृक्षा जो घाली मध तूपही ॥
पूजी जो गंधपुष्पांनीं सर्वांना कडु हा असे ॥५॥
गद्य-हीस सरस्वती-कंठाभरणा तुल्य योगिता ह्णणतात.
आर्या-उत्कृष्ट गुणांनीं जरि समक्रिया तुल्य योगिता तीच ॥
यमवरुणकुबेरहि तूं राजेंद्रा पाकशासनहि तूंच ॥६॥

गद्य-
ह्या अलंकारास कित्येक ग्रंथकार माला रुपक ह्नणतात.

अनुष्टुप्‍-
संगती मृगनेत्रांची विजेचें खेळणें तसें ॥
न राहती दोन क्षण घनारब्ध जरी स्वतां ॥७॥
आर्या-ऐसा श्रीमद्गुरुनें केला आह्मांवरी प्रसाद बुधा ॥
तन्मधुरता न जननी-स्तन्या न काम-धेनुच्याहि दुधा ॥८॥
बृहद्दशम.

गद्य-
ह्या तुल्य योगितालंकारास कित्येक सिद्धी असें ह्णणतात.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP