मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
हेतु

अर्थालंकार - हेतु

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
ज्यास असे हेतु अशा कार्यासह हेतु कथन हेतु तो ॥
छेदाया मान शशी सुतनूचा उदयगिरिवरी येतो ॥१॥
सुतनु ! प्रवालासम हा अधर तुझा मारवाडपथसा गे ॥
कोणाचे न मनाला तृष्णाकुल तो करी-प्रिये सांगे ॥२॥
कार्य हेतू यांचे ऐक्यचि तरि नाम तें अलंकृतिचें ॥
वेंकटगिरीश याचे कटाक्ष लक्ष्मी - विलासचि बुधांचे ॥३॥
यांस अभिदाहेतु असें कितीएक ह्मणतात. या प्रमाणेंच: -

आर्या-
त्या दीनवत्सलाची करुणा झाली पुरी बरी मोठी ॥
होय प्रसाद तोचि प्रासाद जयांत कौतुकें कोटी ॥४॥
बृहद्दशम.

श्लोक-
दानांचे नरवीर जीवितचि हा विश्वास हा मूर्तिमान ॥
राजांच्या नयनांस उत्सव खरा नारींस हा देहवान्‍ ॥
हा आनंद बुधास जाण तनुमान्‍ वीरश्रिचें जीवित ॥
धर्माचें घर हा कलिंगनृपती नांदे इथें सांप्रत ॥४॥
रक्षाया हा जन अवतरे मूर्तिमानस्त्रवेद ॥
साक्षात्क्षात्रद्विजसमवना धर्म हा निर्विवाद ॥
शक्तीचा हा समुदय खरा वास हा सद्गुणांचा ॥
पुण्यांचा हा प्रकट पुतळा जाहलासे जगांचा ॥६॥

आर्या-
जांबवदुक्तें हर-गिरि-सख ओषधिनग तदीय-शिखरा या ॥
हस्तें घेउन आलों प्रभुयश लोकत्रयांत विखराया ॥७॥
हनुमत्‍रामायण.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP