मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
पूर्वरुप

अर्थालंकार - पूर्वरुप

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
निजगुण येती पुनरपि त्यागा नंतरचि पूर्वरुप तया ॥
हरकंठी जरि लागे शेष तरी श्वेत हो यशें तुझिया ॥१॥

श्लोक-
विभिन्नश्रवणीं गरुडाग्रजाचें । तेजें जहाले हय जे रवीचे ॥
वंशांकुराचेपरि नील रत्नीं । पूर्वद्युती त्या दिधली प्रयत्नीं ॥२॥

गद्य-
काव्यप्रकाशकारांनीं या अलंकारास तद्रूणच मानिलें आहे. कारण या दोन्ही अलंकारांची लक्षणें पाहिलीं असतां पूर्वरुप हा  अलंकार तद्रूणालंकारांत मोडतो असें दिसतें.

आर्या-
पूर्वावस्था जरि ये झाल्यावर वस्तुनाश तरिही तो ॥
मालविल्यावरति दिवा कांची रत्नीं उजेड बहु पडतो ॥३॥

श्लोक-
खग्डी बैसती देवडीवर तुझ्या बाहेर तैसे करी ॥
रत्नें संकुल कंचुकी फिरत तो अंत:पुरा भतिरीं ॥
शय्यास्थान तसेंच तेंहि महिषी राजा तुझें व्यापिती ॥
शत्रूचे भुवनीं स्थिती जरि नसे कोणी तरी तेच ती ॥४॥

येथें खग्डी, कंचुकी व महिषी हे शब्द श्लिष्ट आहेत. खग्डी=तलवार ज्यांचे हातांत आहे असे पुरुष किंवा गेंडे; कंचुकी=अंत:पुरांतील सेवक किंवा सर्प आणि महिषी=अभिषिक्त स्त्री
किंवा ह्मैस.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP