मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
विशेषोक्ति

अर्थालंकार - विशेषोक्ति

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


अनुष्टुप्‍ -
विशेषोक्ति न हो कार्य असतां कारणें बहु ॥
स्नेहक्षय न हो चित्तीं स्मरदीप जरी जळे ॥१॥
अनुरागवती संध्या दिनही ती पुढें असे ॥
विचित्र गति दैवाची समागम न हो कधीं ॥२॥
गद्य-काव्य जरी झोंप रवी उदेला । द्वारीं सखीचा जन सर्व आला ॥
प्रियें न तीला जरि आवळीलें । आलिंगनापासुन ती न हाले ॥३॥ अ.नि.

आर्या-
जो कापुरापरी जरि जळला तरि शक्तिमान्जनीं दिसला ॥
अनिवार वीर्य ज्याचें असो नमस्कार त्याच मदनाला ॥४॥ उ.नि.
तो एकटा असूनहि जिंकी त्रैलोक्यवरिवान्मदन ॥
जाळुनिया तत्तनुला हरि ज्याचें वीर्य न त्रिपुरमथन ॥५॥ अचि.नि.

गद्य-
काव्यादर्शकार असें ह्णणतात:- विशेष दाखवावयाचा असतां
गुण, जाति, क्रिया व द्रव्य यांचें जेव्हां वैकल्य दाखविलें असतें तेव्हां
हा अलंकार होतो.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP