मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
यथासंख्य

अर्थालंकार - यथासंख्य

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
क्रमोक्त -वस्त्वन्वय जैं क्रमें हो । तेव्हां यथासंख्य तया ह्णणा हो ॥
शत्रूंस, मित्रांस, विपत्ति सारी । जिंकी, सुखी राख, पळीव दूरी ॥१॥

जेव्हां कोणीं एका क्रमानें, कांहीं वस्तु एकवार सांगितल्या असता त्यांचा दुसर्‍या वस्तूंशी अन्वय त्याच क्रमानें होतो. तेव्हां हा अलंकार होतो. जसें दुसर्‍या चरणांत शत्रू, मित्र, व विपत्ति या शब्दांचा  "जिंकी" "सुकी राख" व "दूर पळीव" या शब्दांशी अन्वय त्याच
क्रमानें झाला आहे; म्हणजे शत्रूंस जिंक मित्रांस सुखी राख, व विपत्ति सारी दूर पळीव असा अन्वय झाला आहे.

ती काय बा शरण येति धनें तयाला ? ॥
किंवा विषासदृश मारिति काय त्याला ? ॥
ज्याकारणें कृपण त्यां दुसर्‍या न देतो ॥
भोगावया न कधिंही अथवा पहातो ॥२॥
तूं एकटा त्रिविध होशि मनांत त्यांच्या ॥
शत्रू-सुधी-कुरग-चंचल-लोचनांच्या ॥
संताप, हर्ष, रतिही बहु वाढवोनी ॥
शोर्यानलें नवगुणेंहि विलास यांनीं ॥३॥

आर्या-
नररत्न तोचि तूंचि स्त्रीरत्न उदंड आडनावांचीं ॥
न बुडविति न बा तारिति चित्रें बरवीं हिं आड-नावांचीं ॥४॥

गद्य-
यास क्रमालंकार असें कितीएक ह्णणतात. वनपर्व.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP