मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार| अतिशयोक्ति अर्थालंकार उपमा अनन्वय उपमेयोपमा प्रतीप रुपक परिणाम उल्लेख स्मरण भ्रांतिमान् संदेह अपन्हुति उत्प्रेक्षा अतिशयोक्ति तुल्ययोगिता दीपक आवृत्तिदीपक प्रतिवस्तूपमा दृष्टांत निदर्शना व्यतिरेक सहोक्ति विनोक्ति समासोक्ति परिकर श्लेष अप्रस्तुतप्रशंसा प्रस्तुतांकुर पर्यायोक्त व्याजस्तुती व्याजनिंदा आक्षेप विरोधाभास विशेषोक्ति विभावना असंभव असंगती विषम सम विचित्र अधिक अल्प अन्योन्य विशेष व्याघात कारणमाला एकावली मालादीपक सार यथासंख्य परिवृत्ति पर्याय परिसंख्य विकल्प समुच्चय कारदीपक समाधि प्रत्यनीक काव्यार्थपत्ति काव्यलिंग अर्थांतरन्यास विकस्वर प्रौढोक्ति संभावना मिथ्याध्यवसिति ललित प्रहर्षण विषादन उल्लास अवज्ञा अनुज्ञा लेश मुद्रा रत्नावली तद्रूण पूर्वरुप अतद्रूण अनुगुण मीलित सामान्य उन्मीलीत विशेषक उत्तर सूक्ष्म पिहित व्याजोक्ति गूढोक्ति विवृतोक्ति युक्ति लोकोक्ति छेकोक्ति वक्रोक्ति स्वभावोक्ति भाविक उदात्त अत्युक्ति निरुक्ति प्रतिषेध विधि हेतु प्रत्यक्षप्रमाण अनुमान उपमानप्रमाण शब्दप्रमाण अर्थापत्ति अनुपलब्धि संभव ऐतिह्य अनुकूल आशी रसवत् प्रेय ऊर्जस्वित् समाहित भावोदय भावसंधि भावशबलता संसृष्टि संकर चेतनगुणोक्ति अर्थालंकार - अतिशयोक्ति काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात. Tags : grammermarathiअलंकारमराठीव्याकरण अतिशयोक्ति Translation - भाषांतर अनुष्टुप् - उपमानपदें जेव्हां । उपमयेचि जाणिजे ॥रुपकातिशयोक्तीते । नीलाब्जोत्पन्न - मार्गण ॥१॥येथें नीलाब्ज व मार्गण हीं उपमानपदें आहेत व नेत्र आणि कटाक्ष हीं उपमेयें आहेत. नीलाब्ज=नील कमल व मार्गण=बाण याशब्दांनीं नेत्र व कटाक्ष या शब्दांचे ग्रहण आहे. श्लोक-वापी कोणी गगनिं दिसते तीपुढें ऐंद्रनीला ॥पद्या शोभे तदुपरि दिसे हैम-सोपान-माला ॥अग्रीं दोघे गिरि सुगम ते व्याप्त जे चंदनानें ॥तत्र त्यांना सुलभचि सुधा इंदुच्या संन्निधानें ॥२॥हें मध्य भागापासून तों मुखापर्यंत नायिकेच्या अंगांचें वर्णन आहे. येथें वापी, पद्या, सोपानमाला, गिरी व इंदु, य शब्दांनीं नाभी,रोमावळी, त्रिवळी, स्तन व मुख, यांचें ग्रहण आहे. चकोरांनीं रानीं अमृत-अशना लागि वरिली ॥अशी ज्योस्त्रा ज्यानें विमलतर लोकीं पसरिली ॥अनाकाशीं ऐसा गलितमृगसा शीतकर हा ॥जरा प्राकाराग्रीं नजर तरि फेकूनचि पहा ॥३॥येथें शीतकर या शब्दानें सुंदरीचें मुखाचे ग्रहन आहे. याप्रमाणेंच.आर्या-हरिच्या पुन: पुन्हां कां काडया नाकांत घालिशी शशका ॥यश काय पक्षिपतिचें येइल हे चार करुनिया मशका ॥४॥सभापर्व.गद्य-ह्यास रुपकातिशयोक्ति ह्णणतात. श्लोक-मोतीं विद्रुम यामधें मधुरता पुष्पीं नसें त्यापरी ॥त्या वस्तू विधुमंडळींच दिसती नाहीं कदां सागरीं ॥तेंही मंडल शंखमूर्धि उदया पावे न पूर्वे कदां ॥ज्यांही तीस न पाहिलें जन असे ते कल्पिती सर्वदां ॥५॥येथें मोतीं, विद्रुम-पोवळे,विधुमंडल व शंख, या शब्दांनीं कामिनीचे दांत, अधर, मुख, व कंठ यांचें ग्रहण करावयाचें आहे. पुष्पांतमधुरता तशी नाहीं. जशीं मोती व विद्रुम ह्णणजे कामिनीचे दांत व अधरोष्ठ यांमध्ये आहे, इत्यादि अर्थांनीं अपन्हुतीही दाखविली आहे. गद्य-हीस सापन्हवातिशयोक्ति ह्णणतात.आर्या-हीस भेदकातिशयोक्ति ह्णणतात. आर्या-जरि वीर रुद्रराजा दाता तरि नष्ट अल्प दिवसांत ॥हो कनकगिरी जाणुन कोकी आनंदयुक्त होतात ॥७॥गद्य-येथें मेरु नाहींसा होण्यास वीररुद्रराजाचें दातृत्व कारण होणार आहे. ही अतिशयोक्ति आहे. चक्रवाकींना आनंदयुक्त होण्याचें कारन इतकेंच कीं, मेरु नाहींसा झाला असतां सूर्याचें तेज नेहमीं राहील व रात्र कधींही होणार नाहीं. आणि असे झालें असतां त्यांचाव पतीचा विरह कधींही होणार नाहीं हे आहे. तसेंच.श्लोक-जो अबरीं उफळतो खुर लागलाहे ॥तो चंद्रमा निजतनूवर डाग लाहे ॥जो या यशास्तव कसें धवलत्व नेघे ॥शृंगारिला हय तयावरि भूप वेधें ॥८॥रघुनाथपंडित.गद्य-हीस संबंधातिशयोक्ति ह्नणतात.आर्या-स्तनमंडलें अनिंद्ये ! हीं दिवसोंदिवस वाढतीं समदें ॥बाहुलतांच्यामध्यें यांना अवकाश ना मिळे प्रमदे ॥९॥गद्य-हीस असंबंधातिशयोक्ति ह्णणतात.श्लोक-हम्मीर खड्गेंत्यजितांच कोशा ॥सोडून देती अरिकोश आशा ॥होतां तया कंप अरीस होतो ॥तत्प्राणही तें सुटतांच जातो ॥गद्य-हीस आक्रमातिशयोक्ति ह्णणतात.श्लोक-घ्यायाला कुसुमांकडेस बघतां हस्ताग्र तें लाल हो ॥लाक्षारंजनशब्द ऐकुन तिचीं होतीं पदें लाल हो ॥देतां आटव चंदनादिउटिचा हो दु:ख भारी तिला ॥हा ! तीतें कबरी-सुगंधविरहें भारापरी जाहला ॥११॥आर्या-जातों मी नचि जातों वदतां प्रियकर क्षणांत सुतनूचीं ॥मळलीं पुढलीं वलयें उरलीं फुटलीं तशींच तीं साची ॥१२॥गद्य-ह्यास चपलातिशयोक्ति ह्णणतात.श्लोक-अधींच बहु अंगणीं कविवरांचिये बांधिले ॥करी मद-जलार्थ त्यांस मधुपीं अति त्रासिलें ॥तशांत पडले पयोदधि - महत्तरंगापरी ॥कटाक्ष-चय काकतीय-पतिचे तयाचे वरी ॥१३॥गद्य-हीस अत्यंतातिशयोक्ति ह्णणतात.निजरक्तें नाहविले शोणित तटिनींत भट सगज वाहविले ॥यवस धरचि राहविले अमरा नृत्यत्कबंध पाहविले ॥१४॥बृहद्दशम. N/A References : N/A Last Updated : February 23, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP