मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
लेश

अर्थालंकार - लेश

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
दोषाला गुण अथवा दोष गुणा मानितात लेश तर ॥
स्वच्छंदचारि पक्षी तूं बद्ध शुका त्वदुक्ति कीं मधुर ॥१॥

श्लोक-
साधु सच्चरितींच लंपट खरें स्वेच्छे न ते चालती ॥
लोकांची अपवादभीति बहु त्या दु:खें जगीं राहती ॥
अज्ञानी करिती बुरें न बरवें दु:खी न होतात ते ॥
युक्तायुक्त विचारशुन्य जन जे ते पात्र हो धन्यते ॥२॥
देशी सारें सर्वदां सर्व लोकां । मिथ्या राजा बा स्तवीती तुला कां ॥
त्वच्छत्रूला पाठ ती प्राप्त नोहे । अन्य स्त्रीला ऊर अप्राप्त आहे ॥३॥
तुझी वाणी कोणी म्हणति गुण हा अद्भुत असे ॥
मला वाटे मोठा तुजजवळि हा दोषचि वसे ॥
शुका तद्योगें तूं अनवरत बंधांत पडसी ॥
गड्या स्वातंत्र्याची अनुपम सुखें सर्व मुकसी ॥४॥

आर्या-
हा तरुण गुणी राजा योग्य तुला पाहिला असे वर गे ॥
कामोत्सवाहिपेक्षां युद्धोत्सव अधिक नृपमनीं वागे ॥५॥
निर्दय चपल असा हा समाजावुनि काय गे करावें या ॥
लपवाया अपराधां शिकला हा गोड शब्द बोलाया ॥६॥

श्लोक-
इंदूचा हा मल, पशुपतीकंठ, लक्ष्मीपती ही ॥
दिड्गांचीं मद-जल-मषीयुक्त गंडस्थले हीं ॥
सारे उर्विवलयतिलका काजळें माखियेलें ॥
आम्हां भासें अजवरि यशें पांढरें काय केलें ? ॥७॥

गद्य-
वरील श्लोक ३ यांत राजाचा गुण दोषत्वानें घेतला आहे. परंतु त्यांत व्याजस्तुतिही केली आहे म्हणून येथें या दोन अलंकाराचा
संकर आहे. असे समजावे. याप्रमाणेंच श्लोक ५ व ६ यांत व्याजस्तुति व लेश यांआ संकर आहे. श्लोक ७ यांत दोषाला गुण किंवा गुणाला दोष अशा प्रकारचें कांही नाहीं. परंतु स्तुतिपर्यवसायी निंदा आहे म्हणून यास व्याजस्तुति म्हटले पाहिजे.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP