मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
कारदीपक

अर्थालंकार - कारदीपक

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
कारक दीपक जाणा क्रमें क्रिया कारकैकग - तयास ॥
जाई येई पाहे वाटसरु वाट पुसतसे त्यास ॥१॥

येथें जाण्याची, येण्याणी, पहाण्याची व वाट पुसण्याची या क्रिया वाटसरु या एका कारकावर आल्या आहेत. ह्णणून हें कारकदीपक झालें या प्रमाणेच पुढल्या तीन श्लोकांत निजणें इत्यादि क्रिया नृपती या एका कारकावर अवलंबून आहेत.

आर्या-
निजले न्हाती जेविति, फिरती केशास जाळवी ताती ॥
अंतरगृहांत असती फाशांनीं खेळती अहो नृपती ॥२॥
आतां जा पुनरपि या बोलाया आज वेळ न मिळेच ॥
या परि द्वारीं रक्षक चाळविती दीन बापुड्या साच ॥३॥
तुजपाशीं आलों कीं आह्मा क्षिराब्धि करुन लवलाही ॥४॥
श्लोक-ते पुष्पिताग्र तरु पाहुन अध्व गाला ।
तेव्हां प्रिया विरह खेदहि फार झाला ॥
झाकी करे नयन सुस्वर तैं रडे तो ।
आक्रंदना करि सुगंधाहे तो न घेतो ॥५॥
आर्या-ज्ञहि अज्ञहि जन तारी नामें कामादि शत्रुही मारी ॥
स्वयशें भव-भय वारी करि भक्त-मयूर-घन दया भारी ॥६॥
मात्रारामायण.

श्लोक-
जटायु मूर्छित क्षतार्त देखतां गळां पडे ।
रडे पुसे कथी परंतु मृत्यु सांगतां घडे ॥
दडे महूर्त पूर्व शोक यापुढें मनीं जडे ।
अडेचि धैर्य, तोय दे निघे शुगब्धिचे कडे ॥७॥
पंचचामर रामायण.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP