मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार| दीपक अर्थालंकार उपमा अनन्वय उपमेयोपमा प्रतीप रुपक परिणाम उल्लेख स्मरण भ्रांतिमान् संदेह अपन्हुति उत्प्रेक्षा अतिशयोक्ति तुल्ययोगिता दीपक आवृत्तिदीपक प्रतिवस्तूपमा दृष्टांत निदर्शना व्यतिरेक सहोक्ति विनोक्ति समासोक्ति परिकर श्लेष अप्रस्तुतप्रशंसा प्रस्तुतांकुर पर्यायोक्त व्याजस्तुती व्याजनिंदा आक्षेप विरोधाभास विशेषोक्ति विभावना असंभव असंगती विषम सम विचित्र अधिक अल्प अन्योन्य विशेष व्याघात कारणमाला एकावली मालादीपक सार यथासंख्य परिवृत्ति पर्याय परिसंख्य विकल्प समुच्चय कारदीपक समाधि प्रत्यनीक काव्यार्थपत्ति काव्यलिंग अर्थांतरन्यास विकस्वर प्रौढोक्ति संभावना मिथ्याध्यवसिति ललित प्रहर्षण विषादन उल्लास अवज्ञा अनुज्ञा लेश मुद्रा रत्नावली तद्रूण पूर्वरुप अतद्रूण अनुगुण मीलित सामान्य उन्मीलीत विशेषक उत्तर सूक्ष्म पिहित व्याजोक्ति गूढोक्ति विवृतोक्ति युक्ति लोकोक्ति छेकोक्ति वक्रोक्ति स्वभावोक्ति भाविक उदात्त अत्युक्ति निरुक्ति प्रतिषेध विधि हेतु प्रत्यक्षप्रमाण अनुमान उपमानप्रमाण शब्दप्रमाण अर्थापत्ति अनुपलब्धि संभव ऐतिह्य अनुकूल आशी रसवत् प्रेय ऊर्जस्वित् समाहित भावोदय भावसंधि भावशबलता संसृष्टि संकर चेतनगुणोक्ति अर्थालंकार - दीपक काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात. Tags : grammermarathiअलंकारमराठीव्याकरण दीपक Translation - भाषांतर अनुष्टुप्-प्रस्तुताऽप्रस्तुतांचें हो धर्मैक्य तरि दीपक ॥शोभे मदानें कलभ प्रतापानें महीपतिं ॥१॥गद्य-यांत हत्तीचे छाव्याचा मदजलाचे योगानें, व राजाचा प्रतापाचे योगानें, एक धर्म दाखविला आहे. राजाची शोभनक्रिया प्रस्तुतअसून हत्तीचे छाव्याची अप्रस्तुत आहे. याप्रमाणेंच खालीं ही: -आर्या-निकषें जरि घासियला तरि मणि, जखमी रणीं जरी विजयी ॥क्षीण मदें जरि करिवर, शुष्क नदीतीर जरि शरत्समयीं ॥२॥चंद्रकला मात्र जरी, सुरतीं म्लानांग जरि असे बाला ॥तरि शोभती तनुत्वें दानें जरि हीन-वित्त नृप झाला ॥३॥येथें राजाचें वर्णन करणें प्रस्तुत आहे; व मणी, विजयी, करी, नदीतीर, चंद्र व बाला इतक्यांचीं वर्णनें अप्रस्तुत आहेत असें असून त्यांचे शोभाधर्माचा एक अन्वय केला आहे.ही कनक पुष्पभूमी संग्रहिती तीन पुरुष जगतांत ॥जे शूर जेच विद्वान सेवाधर्मास जे समजतात ॥४॥त्या राघवें पुरीला वियोग दिधला नृपेंहि धरणीला ॥ईर्षा पुत्रासह ही केली कीं दाखवून करणीला ॥५॥मंत्ररामायण.येथें रामाचा व दशरथाचा एक धर्मान्वय केला आहे. ह्णणजे वियोग देण्याची क्रिया सारखीच वर्णन केली आहे. गद्य-तुल्य योगितेंत एक प्रस्तुत व दुसरें अप्रस्तुत असें नसतें, सर्वच प्रस्तुत किंवा सर्वच अप्रस्तुत असें असतें. काव्यादर्शकारांनीं दीपकालंकाराचें असें लक्षण दिलें आहे. जाती, क्रिया,गुण व द्रव्य यांपैकीं कोणत्याही एकाला दाखविणारें पद एक ठिकाणीं उक्त असून त्याचा सर्व वाक्यावर उपकार होतो तेव्हां हा अलंकार होतो. त्यांनी दीपकाचे उपभेद चार मानिले आहेत. १ मालादीपक,२ विरुद्धार्थ दीपक,३ एकार्थ दीपक,४ श्लिष्टार्थदीपकयांपैकीं मालादीपकांविषयीं पुढें लिहिण्यांत आलें आहे. बाकीचे तीन दिपकांची उदाहरणें खालीं देतों. आर्या-अभिमान मन्मथाचा पयोद-पटलें बहूत वाढविती ॥कृश करिती ग्रीष्माचा जरि वायू सलिलबिंदु उडवीती ॥६॥वि.दी.हरिते दिग्विस्तारा, ग्रहण करी तारका-गणाला ती ॥घेते प्राणचि माझा जलधर-पंक्ती कशी पहा गे ती ॥७॥ए.दी.गे हृद्य-गंधवह हें शाम जयांची तमालवत्कांती ॥ऐसे घन आकाशीं मत्त करी भूतलावरी फिरती ॥८॥श्लि. दी. N/A References : N/A Last Updated : February 23, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP