मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
विकल्प

अर्थालंकार - विकल्प

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
तुल्यचि बल दोघांचे असतांहि विरोध तो विकल्प खरा ॥
या काळीं मनुजेश्वर चापां नमवोत वा स्वकीय शिरां ॥१॥

श्लोक-
पर्जन्य हा संतत-धार वर्षे । मयूरही नाचति फार हर्षे ॥
कृतांत वा प्राणपती अशांत । येवोनि दु:खाग्नि करील शांत ॥२॥
कंठी माझ्या परशु विलसो तीक्ष्ण वा पुष्पमाला ।
होवो स्त्रीचे नयन पद तें कज्जला वा जलाला ॥
पाहूं आह्मी सतत सुख वा अंतकाचे मुखाला ।
कांहीं होवो परि नच करुं ब्राह्मणीं बाणलीला ॥३॥

आर्या-
संपादिलें धन तुवां द्यावें देवांस ब्राह्मणां अथवा ॥

गद्य-
ह्या अर्धांत चातुर्य कांही न दाखविल्यानें येथें हा अलंकार
होत नाहीं.

आर्या-
मिथ्यापर्तिज्ञ अर्जुन आजचि रे करिन मारुनी तुजला ॥
घे शस्त्र टाक अथवा जोडाया मजपुढेंचि अंजलिला ॥४॥
हो सिद्ध अंश द्याया द्याया स्वप्राण सिद्ध अथवा हो ॥
कथवा हो त्याकरवीं यश नाकीं वीरलोक - पथ वाहो ॥५॥
उद्योगपर्व.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP