अर्थालंकार - गूढोक्ति
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
अन्योद्देशें कथणें अन्या गूढोक्तलंकृतीच तरी ॥
हो वृषभ दूर दुसर्या शेताहुन येतसेहि शेतकरी ॥१॥
श्लोक-
गेला मत्पति तो हटा; सवत ती पर्वा न माझी करी ॥
टाकूनी मज पुष्पिणीस गुरुही जाती गृहाभीतरीं ॥
शय्या मात्र सहाय ही परिजनीं श्रांतीं मला सोडिलें ॥
दावी आगमलालनीय ! मजला लक्ष्मीपते ! पावलें ॥२॥
लक्ष्मीपति हें कोणा एका स्त्रीचे जाराचें नांव होतें. घरांतील दुसर्या लोकांस फसवून आपला कार्यभाग साधून घेण्याकरितां तिनें विष्णूची प्रार्थना करण्याचे उद्देशानें सर्व हकीकत सांगून जारास निर्भयपणें आपलेकडे येण्यास सांगितलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018

TOP