मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
व्याजनिंदा

अर्थालंकार - व्याजनिंदा

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


अनुष्टुप्‍-
निंदेनें ध्वनि निंदेची व्याजनिंदा तया ह्णणा ॥
विधे ! तो निंद्य जो पूर्वी हरी एकचि त्वत्‍शिर ॥१॥

श्लोक-
विधि हाच विशेष निंदनीय । करटा ! तूं रट दोष तूज काय ॥
सहकारतरुवरा अशाला । बसवी तो पिकसंगती कशाला ॥२॥
आर्या-तरुकुल शोभा हरिते जीवां सर्वांस दु:ख देणारी ॥
गुण कोणता विलोकुन हिमालया । बर्फरास धरिशि शिरीं ॥३॥
विश्वास मधुरवचनीं दाउन साधूंस ठकविती लीन ॥
त्यांनाहि धरिशि माते धरे विवेकें किती ? असशि हीन ॥४॥

श्लोक-
नाहीं रुप धनव्ययास गणिलें क्लेशांस संपादिलें ॥
स्वच्छंदी जन जो तदीय हृदयीं चिंताज्वरा निर्मिलें ॥
झाली हे स्वगुणानुरुप रमणा भावे मतप्रायशी ॥
हेतू काय धरुन सांग विधिनें निर्माण केलें हिशी ॥५॥
वाणीमध्ये वीर्य सिद्ध द्विजांचें । बाहूंमध्यें तेंवि तें क्षत्रियांचें ॥
शस्त्रग्राही जामदग्न्य द्विजाला । जिंकोनी बा राम कां । स्तुत्य झाला ॥६॥

आर्या-
सर्व श्रुति -शास्त्रांतें पढलों परि मी पहा महा मुग्ध ॥
तक्राइ दोष कैचा शुभ्रपणें म्यांचि मानिलें दुग्ध ॥७॥
बृहद्दशम.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP