मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
व्याघात

अर्थालंकार - व्याघात

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
जें जें साधन ऐसें मानिति ते जैं विरुद्ध साधन हो ॥
व्याघात तरी ज्यांहीं जगतोषें मारि मदन त्यांहीं हो ॥१॥

श्लोक-
नेत्रें शिवें मन्मथ दग्ध केला । नेत्रें स्त्रिया जीवविती तयाला ॥
शिवावरी या जबर्‍या विलोकी । स्तुती तयांची करितों अहो कीं ॥२॥
आर्या - कार्या विरोधकारी असतां सौकर्यकारक अशोच ॥
गणिली जाते कृति जरि व्याघातालंकृती तरी साच ॥३॥
कृपण धनाला रक्षी दारिद्र्याची मनीं धरुन शंका ॥
दाताहि तीच शंका धरुन मनीं देतसे धनहि लोकां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP