मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
रुपक

अर्थालंकार - रुपक

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


अनुष्टुप्‍ -
विषय्य भेद ताद्रुप्य रुपानें जरि रंजन ॥
विषयाचें तरी त्याला रुपकालंकृती ह्णणा ॥१॥
अहो हा धूर्जटी साक्षात्‍ जो जाळी त्रिपुरा क्षणें ॥
हा शंकर असे मात्र तिसरा नेत्र या नसे ॥२॥
विरुपाक्षचि हा विश्वा पाळितो सम-दृष्टिनें ॥
हिचा मुखेंदु नेत्रा दे आनंद विधु कासया ॥३॥

उपमानाचें रुपानें जें उपमेयाचें वर्णन करणें त्यास रुपक हें नांव आहे.
श्लोक दोन यांत राजास शंकर असेंच मानिलें आहे. वस्तुत: राजा
हें उपमेय आहे व शंकर हा उपमान आहे. त्याप्रमाणेंच तिसर्‍या श्लोकाचे
द्वितीय चरणांत मुखालाच चंद्र मानिलें आहे.

श्लोक-मदन - शत्रु - शरासन हें महा ॥
मदन -मुर्तिच केवळ राम हा ॥
करिल सज्ज कसा धनु आपण ॥
अहह दारुण तात तुझा पण ॥४॥
वामन.
आर्या - मुख पंकज-रंगीं या लीलेनें रम्य नृत्य गे करिते ॥
कामुक-मानस हरिते भ्रूवल्ली नायकीण गुणसरिते ॥५॥

यांत भ्रूवल्ली-भवईवर नायिकिणीचें रुपक केलें आहे; आणि मुख-कमलावर रंगसभेचें रुपक केलें आहे.
गद्य-हें रुपक दोन प्रकारचें आहे.
१  अभेदरुपक.
२  ताद्रुप्यरुपक.

ह्या दोहोंपैकीं प्रत्येकाचे तीन तीन भेद आहेत. ते उपमानाचे उपमेयापेक्षां १ अधिक वर्णनानें २ कमी वर्णनानें ३ सारखेंच वर्णन
केल्याने होतात.
साहित्य दर्पणकारांनीं तीन भेद केले आहेत.
१  परंपरित.
२  सांग.
३  निरंग.
श्लोक-चंद्र-जोत्स्त्रा-धवल-शरयू-वालुका-युक्त तीरीं ॥
सिद्ध-द्वंदीं बहुदिन वरी जाहला वाद भारी ॥
कंसा किंवा प्रथम वधिलें कैटभा दैत्य वर्या ॥
त्यांपैकीं तूं प्रथम मजशीं कोण तो सांग आर्या ॥६॥

गद्य-यांत कंस व कैटभ या दैत्यांचा वधकर्ता जो गरुडध्वज तो तूंच आहेस, असें कल्पून प्रश्न केला आहे. यांत तादात्म्य दाखवून सारखेंचवर्णन, नृप व कृष्ण यांचें केलें आहे.

अनुष्टुप्‍-विधिनेम भ्रम दोन्ही हे केले कनक-कामिनी ॥
त्यामध्यें हा अनासक्त साक्षादिश नराकृती ॥७॥
अचतुर्वदर्न ब्रह्मा । द्विबाहु दुसरा हरी ॥
अभाल नेत्र गिरिश । व्यास सत्यवती सुत ॥८॥
श्लोक-येतांचि तूं जलधि कांपतसे कशाला ॥
तूं सेतु-मंथ-करणार ह्णणून भ्याला ॥
द्वीपांतरींहि न तुला अरि-भीति आज ॥
सेवी तुलाच कमला नरदेव राज ॥९॥

येथें एक कवी राजास ह्णणतो कीं, राजा ! तुला येथें आलेला पाहून  समुद्र कां कांपतो आहे बरें ? सेतु करणार जो राम व अमृतमंथन
करणार जो विष्णु तो तूंच काय ह्णणून तो भ्याला ? दुसर्‍या द्वीपांत
ही तुला आज रिपु नाहीं व लक्ष्मी तुला सेविते; यामुळें सेतु किंवा
मंथन करण्याची इच्छा उत्पन्न होणार नाहीं. येथें राजा वर राम व
विष्णु यांचे अभेद रुपक केलें आहे.
पद्माची छबि काय हीन न करी ? आनंद नेत्रां न हो ? ॥
दृष्टीनें झषकेतनास नच दे वृद्धीस कीं काय हो ? ॥
वक्रेंदू असतां कशास उगवे आकाशिचा चंद्रहा ? ॥
मानी गर्व जरी सुधांशु ह्णणुनी बिंबाधरी ती पहा ॥१०॥
यांत तुझा मुखचंद्र असतां आकाशिचा चंद्र कशाकरितां उगवतो
बरे ? असा प्रश्न केला आहे. येथें मुखचंद्र व खरा चंद्र यांत भेद दाखवून
तद्रूपता दाखविली आहे ह्णणून हें ताद्रुप्यरुपक आहे.
काय मानिसी विधो मन हीचें ॥
लीन होईल तुझ्यांतचि साचें ॥
मेलिया नल-मुखेंदुच यातें ॥
प्राप्त होय वदला स्मर मातें ॥११॥
मलिन-कृश-कपोलें वक्र तें शोभिवंत ॥
विलुलित - कबरीनें फार त्यातूण कांत ॥
करुणरसचि जातो मूर्तिमान्सा वनाला ॥
सतनु-विरहपीडा भासली भूमि-बाला ॥१२॥
अहो हीचें साक्षाद्वदन अकलंकी शशधर ॥
सुधा-धारा-वाही अनवरतही बिंब-अधर ॥
पहाचक्षू रात्रंदिवस कमलेंची द्युतितर ॥
तनू-लावण्याचा जलधि अवगाहीं सुखतर ॥१३॥
गद्य-ह्या अलंकारास अधिकारुढ वैशिष्ट्य रुपक असें साहित्य
दर्पणकार ह्णणतात. त्यांचे मतें कोठें समास नसतांही रुपक
होतें. जसें : -
आर्या - वदन तुझें मृगनयने सरोज हें अन्यथा न चित्तीं ये ॥
भ्रमरावलीच केली विधातियें भ्रूलता तुझी सखये ॥१४॥
मद्य-एका स्त्रीस पाहून एक कवी ह्णणतो. हे मृगनयने ! तुझें जें मुख
तें कमल आहे, असे वाटतें; आणि हे सखये ! ही तुझी जी भवई ती
त्या कमलावरची भुंग्यांची ओळख आहे. येथें मुखावर कमलाचें व भवईवर
भुंग्याच्या ओळीचें रुपक केलें आहे.

दुसरी उदाहरणें.
श्लोक-वदली हृदयांत नांदतो । तव माझा अभिलाष चांद तो, ॥
प्रभु मत्प्रिय होय आज वा । न उद्या तूं रुचशील काजवा ॥१५॥
श्री प्रियरामायण.
आर्या - दारिद्र्यग्रीष्मार्के जी होती वाळली जशी उसरी ॥
दुसरी श्री झाली ती वर्षलि वरिहरि-दया सुधाबुसरी ॥१६॥
बृहदृशम.
धर्मकटक खांडववन भिष्म विजय विजय तोचि हरि गमला ॥
शर दव रक्त ज्वालारुपक याहून होय बहु न मला ॥१७॥
भीष्मपर्व.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP