मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
व्याजस्तुती

अर्थालंकार - व्याजस्तुती

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
निंदास्तुतींनीं स्तुतिगर्हणा हो । व्याजस्तुती तीस तुह्मी ह्णणा हो ॥
मंदाकिनी ! काय तुझा विवेक ? । पाप्यांस तूं दाविशि देवलोक ॥१॥

आर्या-
शाबास ! दूति साधू ! यापेक्षां काय गे करायाचें ॥
ज्या अर्थी मजसाठीं ओरखडे सोसिले रद-नखांचे ॥२॥

येथें प्रियकरास बोलावयास सखीला पाठविलें असतां तीच प्रियकराशीं रत झाली हें ओरखडयांवरुन जाणून प्रियेंने तिची स्तुतिरुपानें
निंदा केली आहे.

श्लोक-
अर्धे दानवशत्रुनेंच गिरिजें अर्धांग हो घेतलें
होतां यापरि कीं अभाव जगतीं त्याचा, असें जाहलें ॥
गंगा सिंधुस, अंबरीं शशिकला, नागाधिप क्ष्मातलीं, ॥
सर्वज्ञत्व अधीश्वरत्व तुजला, भिक्षा मला पातली ॥३॥
येथें राजाची स्तुतिरुपानें निंदा केली आहे. कवी ह्णणतो राजा !

तूं माझें दरिद्र घालवावयास समर्थ असतां मला असाच कां भिकारी राखला आहेस ? तुझें सर्वज्ञत्व व अधीश्वरत्व माझे अगदीं उपयोगीं नाहींसें झाले आहे.

वारंवार न पाहसी धनिमुखा तूं गोड ना बोलसी ॥
त्यांच्या गर्ववचां न ऐकसि न तूं आशेमुळें धांवसी ॥
वेळीं बालतृणेंहि खाउनि सुखें तूं नीजसी भूवरी ॥
केलें त्वां तप काय तें मजप्रती सांगे मृगा ! सत्वरी ॥४॥

येथें हरिणाची स्तुति केल्यानें राजसेवेनें खिन्न जो आपण त्या  आपली निंदा दर्शविली आहे.

आर्या-
शौर्यप्रभाव किति तरि युद्धाकरितां तुला जरि बहाती ॥
एकाश्वावर बसतां सप्ताश्वारुढ शत्रु तव होती ॥५॥
श्लोक-हेब्रह्मन्‍ ! तुजशीं घडे न अमुची संग्रामवाग्धोरणी ॥
आह्मी फार अशक्त आपण तरी वीरांमधें अग्रणी ॥
राजांचें बल सत्य एक गुण हें कोदंड हो आमुचें ॥
विप्रांचें बल जानवें नवगुणी ठावें असें तूमचें ॥६॥
तूं बा कोण ? कपे ! रघूत्तमगृहीं दूतत्व मीं घेतलें ॥
गेला सांग कुठें ? प्लवंगम जयें लंकापुरा जाळिलें ॥
केला इंद्रजितें निबद्ध ह्णणूनी धि:कारिलें मारिलें ॥
भारी लाजविलें ह्णणून कपिनीं गेला कुठें नाकळे ॥७॥
येथें मारुतीचें निंदेनें दुसर्‍या वानराची स्तुति केली आहे.
आर्या-कोण गिरीवर किति दिन तप यानें कोणते ? तरुणि केलें ॥
ज्यास्तव तवाधरापरि लाल शुकें बिंबफळहि चावियलें ॥८॥

येथें पोपटाचे पोराचे स्तुतीनें नायिकेच्या अधराचा सौभाग्यातिशय वर्णिला आहे. येथेंही व्याजस्तुतिच अलंकार समजावा.

सुत यौवराज्य वर मज देउन गांधर्वविधि करुन मला ॥
वरुनि न जाणे ह्णणशी पूरुकुळीं तूंच सूज्ञ साधु भला ॥९॥
आदिपर्व.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP