मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
पर्यायोक्त

अर्थालंकार - पर्यायोक्त

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
रुंपातरानें कथणें कथावें । पर्यायउक्ती तरि त्या ह्णणावें ॥
माझा नमस्कार असो तयाला । कर्ता वृथा राहु वधुस्तनाला ॥१॥

येथें पर्यायानें सांगितलें आहे. तेथें विष्णूस नमस्कार असो असें थोडक्यांत सांगितले नाहीं. याप्रमाणेच खालींही:-

आर्या-
गंधर्वभयें काळिज धडधड उडतें करें पहा गे हें ॥
त्वब्दंधूंचीं झालीं युगपत्‍ शून्योसवें महा-गेहें ॥२॥
विराटपर्व.

सांग हरिति जी पद्में शिरीषकलिका मृदुत्वदर्पातें ॥
कोठवरी न्याया त्या इच्छी मन अल्पदय तुझें हो ते ॥३॥
इच्छित सिद्धी कपटें, तरि पर्यायोक्त आस बोलावें ॥
जाते रसाल तरुला देखाया येथ आपण बसावें ॥४॥
दे मत्कंदुक राधे परिधानीं ज्या तुवां लपविलेस ॥
बोलुनि ऐसें फेडी नीरी हरि हर्षवोचि तुह्मांस ॥५॥
पाय जयाचे लोकां पाहति ज्यांचीं पदे न दिसतात ॥
विश्वेशा ! तेहि तुझ्या विद्याकलना न पात्र होतात ॥६॥
येथे गौतम व पतंजली हे ऋषि रुपांतरानें सांगितले आहेत.
श्लोक-ज्याचे व्यास प्रमुख तुरगां रक्षिते, सिंधु भाते, ॥
वंदू ज्याला अखिलविबुधीं सार्वभौमत्व येतें ॥
भूशापेटी बलिगृह, वियत्ताटवा ज्या फुलांचा ॥
छाटी राखा शतमख, तरु काम हो चंदनाचा ॥७॥

त्रिपुरासुराचा वध करण्याकरितां जेव्हां शंकर निघाला तेव्हां त्यानें पृथ्वीचा रथ केला, वेद हे घाडे झाले, विष्णु बाण झाला; ज्या शंकराची भूषणें घालण्याची पेटी ह्णणजे पाताळच आहे; कारण त्यास सर्पाचें भूषण आहे. ज्या पुरुशाचा बाग आकाश हेंच आहे; कारण
चंद्र सूर्य हीं पुष्पें तेथें येतात; इंद्रादि अष्ट दिक्पाल हे ज्याची छाटी राखणारे आहेत; कारण शंकर दिगंबर असल्यानें त्याचे दिशाहेंच
व सन म्हटलें तरी चालेल; ज्याचा चंदनवृक्ष मदन हाच आहे, कारण शिव अंगाला भस्म लावितो, आणि मदन हा भस्म झाला आहे;
ज्याचे बाणांचा भाता समुद्र हा झाला आहे, कारण विष्णु समुद्रांत राहतो. ज्याचे वेद हे घोडे असल्या कारणानें व्यासादि त्या घोडयांचे रक्षक झाले आहेत; इत्यादि पर्यायानें येथें शिवाचें वर्णन केलें आहे.

जो चक्षुस्थितकाजळा सकलही राजस्त्रियांच्या पितो ॥
कीर्तीने जगतीत्रयास सकला धावल्य जो आणितो ॥
सेवी नित्य अनेक दिव्य चरितीं अद्यापि जो शंभुला ॥
तो हा मौथिल जामदग्न्य परशू आज्ञापितो तूजला ॥८॥
मारायास सुदर्शनास दिधली आज्ञा हरीनें तिनें ॥
केले ते परिभंणादि सगळे व्यापार तेव्हां सुने ॥
राहूनामक दैत्य-वर्य-युवती-लोकांत तैं राहिला ॥
बाकी चुंबनमात्र एक सुरतोत्साहीं तदां सोहळा ॥९॥

गद्य-
येथें राहुचा देह पतन झाल्यामुळें स्त्रियांचा चुंबन मात्र सोहळा राहिला, हा अर्थ पर्यायानें दर्शविला आहे.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP