मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार| उत्प्रेक्षा अर्थालंकार उपमा अनन्वय उपमेयोपमा प्रतीप रुपक परिणाम उल्लेख स्मरण भ्रांतिमान् संदेह अपन्हुति उत्प्रेक्षा अतिशयोक्ति तुल्ययोगिता दीपक आवृत्तिदीपक प्रतिवस्तूपमा दृष्टांत निदर्शना व्यतिरेक सहोक्ति विनोक्ति समासोक्ति परिकर श्लेष अप्रस्तुतप्रशंसा प्रस्तुतांकुर पर्यायोक्त व्याजस्तुती व्याजनिंदा आक्षेप विरोधाभास विशेषोक्ति विभावना असंभव असंगती विषम सम विचित्र अधिक अल्प अन्योन्य विशेष व्याघात कारणमाला एकावली मालादीपक सार यथासंख्य परिवृत्ति पर्याय परिसंख्य विकल्प समुच्चय कारदीपक समाधि प्रत्यनीक काव्यार्थपत्ति काव्यलिंग अर्थांतरन्यास विकस्वर प्रौढोक्ति संभावना मिथ्याध्यवसिति ललित प्रहर्षण विषादन उल्लास अवज्ञा अनुज्ञा लेश मुद्रा रत्नावली तद्रूण पूर्वरुप अतद्रूण अनुगुण मीलित सामान्य उन्मीलीत विशेषक उत्तर सूक्ष्म पिहित व्याजोक्ति गूढोक्ति विवृतोक्ति युक्ति लोकोक्ति छेकोक्ति वक्रोक्ति स्वभावोक्ति भाविक उदात्त अत्युक्ति निरुक्ति प्रतिषेध विधि हेतु प्रत्यक्षप्रमाण अनुमान उपमानप्रमाण शब्दप्रमाण अर्थापत्ति अनुपलब्धि संभव ऐतिह्य अनुकूल आशी रसवत् प्रेय ऊर्जस्वित् समाहित भावोदय भावसंधि भावशबलता संसृष्टि संकर चेतनगुणोक्ति अर्थालंकार - उत्प्रेक्षा काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात. Tags : grammermarathiअलंकारमराठीव्याकरण उत्प्रेक्षा Translation - भाषांतर अनुष्टुप्-धर्मसंबंध योगानें एकाला अन्य मानणें ॥उत्प्रेक्षा तेधवां; ही ते त्रिविधा कल्पिली असे ॥१॥कोकीचे विरहाग्नीचा धूर हा तम भासतो ॥तमाचे लेप बसती वाटे सकल वस्तुला ॥२॥अंजनाचा जणो होतो वर्षाव गगनांतुनी ॥पृथ्वीवरी टाकिल्यानें पावलें लाल कीं प्रिये ॥३॥चक्रवाक पक्ष्यांचे मादींचा रात्रीं पति-विरहरुप जो अग्नि होतो त्याच्या धुराचा लोटच कीं काय अशी अंधकारावर उत्पेक्षा केली आहे.येथें प्रसरणशील जो अंधकार त्याचें दृष्टि-प्रतिरोधकत्व व प्रसरणशीलत्व इत्यादि गुण धुराचे ठिकाणीं असतात; ह्णणून अंधकारावर धुराची उत्प्रेक्षा केली आहे. या प्रमाणेंच खालच्याही दोन उत्प्रेक्षा आहेत.तिसर्या श्लोकाचे दुसरे अर्धांत स्त्रियेचीं पावलें लाल असण्यास पृथ्वीवर ती टाकण्याची क्रियाही कारण आहे. असें दाखविलें आहे.कारण नसून कारण आहे असें दाखविल्यामुळें ही हेतूत्प्रेक्षा झाली.श्लोक-बालेंदुवद् वाकडि लाल भारी ॥पलाश-पुष्पें रमणीय सारीं ॥वसंत-संप्राप्त-वनस्थलींचीं ॥क्षतें जशीं नूतन तन्नखांचीं ॥४॥येथे वसंत हा नायक व वनस्थली या नायिका असें मानून वसंतानें वनस्थलींना मदनोद्धीपनार्थ जीं नखक्षतें दिलीं आहेत तींच पलाश पुष्पांच्या रुपानें दिसतात कीं काय ? अशी उत्प्रेक्षा केली आहे. गद्य-हीस उक्तविषया लाटांनीं पिष्ट करी फेंसरुप चंदन तें ॥घेउनि या किरणांनीं हिमकर लावी दिगंगनांगांतें ॥५॥गद्य-हीस अनुक्तविषयास्वरुपोत्प्रेक्षा ह्णणतात. श्लोक-रात्रीं रवीचा दिवसा शशीचा ।अभाव हें जाणुनि नाथ भूचा ॥प्रताप-कीर्ती करितो जगीं हो ।भूमीवरी ता चिरकाल राहो ॥६॥येथें प्रताप व कीर्ति करण्यास रात्रीं रवि नसणे व दिवसा चंद्र नसणें हीं कारणें नसतांही तींच कारणें आहेत, असें दाखविलें आहे. ह्णणून हेतूत्प्रेक्षा झाली. आणि सूर्य - चंद्र - सृष्टि झालीच आहे ह्णणून हीस सिद्धविषया हेतूत्प्रेक्षा ह्णणावें. श्लोक-जुनेरथाचे तुरगां त्यजाया । जोडावया उत्तम नूत्न जाया ॥निघे रवी तैं जिकडे उदीची । उप्तत्तिभूमी तुरगोत्तमांची ॥७॥गद्य-हीस असिद्धविषया फलोत्प्रेक्षा ह्णणतात.आर्या-तीं संस्कारापाचुन मळलीं होतीं ह्णणोनिया काय ॥प्रक्षालीं नेत्र-जलें दारा-भरणें समस्त रघुराय ॥८॥मंत्ररामायण.श्लोक-तीं शुभ्र हर्ग्यावरती सुखानें । निद्रिस्तनारी-वदनें शशीनें ॥रात्रीं विलोकूनि निशा-क्षयीं तो । लज्जेजणू पांडुरवर्ण होतो ॥९॥जातां तटीं त्या तिमि-घट्टनानें । परि-स्त्रिया पाहून साध्वसानें ॥क्षिप्रानदी फेनमिषें करीशी । तैं आट्टहासा दिसली जनासी ॥१०॥गद्य-हीस सापन्हवास्वरुपोत्प्रेक्षा ह्णणतात.श्लोक-हें तांबडें फार ह्णणून येथें । बिंबत्व शोभें, अधरत्व तेथें ॥विशेष दोहोंत दिसे न याला । ह्णणोन नाभीं भ्रमसत्य झाला ॥११॥गद्य-हीस सापन्हवास्वरुपोत्प्रेक्षा ह्णणतात. श्लोक-हें तांबडें फार ह्णणून येथें । बिंबत्व शोभे, अधरत्व तेथें ॥विशेष दोहोंत दिसे न याला । ह्णणोन नामीं भ्रमसत्य झाला ॥११॥गद्य-हीस पर्यस्तापन्हुति-गर्भास्वरुपोत्प्रेक्षा ह्णणतात.आर्या-रवि किरणतप्त गज हा तत्पक्षीं पद्मसंघ बाधाया ॥न्हाया न सरीं शिरतो स्नान गजाचेंहि जातसे वाया ॥१२॥गद्य-हीस सापान्हवा-फलोत्प्रेक्षा ह्णणतात.श्लोक-पयोधिला तो भरतीस यावया । जणो शशीकांत-मण्यांतुनी पया ॥कितीक कोकी नयनांतुनी शशी । वियोग होतां पतिचाहि आकशी ॥१३॥गद्य-हीस सिद्धविषया-फलोत्प्रेक्षा ह्णणतात. श्लोक-हा हा देवी ! हृदय उलतें मत्तनू हे गळाली ॥झालें शून्य त्रिजग हृदया जाळितो ज्वालमाली ॥अंध:कारी निविड गडला अंतरात्माच भावें ॥मोहें कांहीं मज नचि दिसे काय आतां करावें ? ॥१४॥स्वगोसहस्त्रीं मिळवून संगें । गोसंघ नेले परकीयअंगें ॥दिवाकरें नेत्रहि नाम ज्याचें । अंधत्व तेणें न तमें तयाचें ॥१५॥गद्य-हीस असिद्धविषया-हेतूत्प्रेक्षा ह्णणतात.अस्ताचलावर उभा जव चंद्र ठाके ॥पूर्वेस तोंच रविसारथितेज फांके ॥अस्तोदयें करुनि एकसमींच लोकां ॥आपत्सुखानुभव दाविति ते जणो कां ॥१६॥येथें विपत्ति व संपत्ति हीं एकामागून एक कशी येतात हें दाखविण्याकरितांच काय सूर्य-चंद्र अस्तोदय पावतात ? अशी उत्प्रेक्षा केली आहे. आर्या-कीशक्षांच्या सेना घेऊन श्रीश सागरा गेला ॥वाटे हा शुद्धाब्धिक्षारीं जाणोनि आग रागेला ॥१७॥दिव्य रामायण. N/A References : N/A Last Updated : February 23, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP