मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
काव्यार्थपत्ति

अर्थालंकार - काव्यार्थपत्ति

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
काव्यार्थपत्ति तरि कमुत्यें अर्थ सिद्ध जरि होय ॥
शशिला जिंकी त्वन्मुख सरसिंहरुहांची पुढें कथा काय ॥१॥

श्लोक-
अधीर नेत्रा-धर हा पहा तो । जो बंधुजीवद्युतिला हरीतो ॥
तो अन्यजीवद्युतीला हरे हें । आश्चर्यकारी न मुळींच आहे ॥२॥
आर्या-भेदोन हृदय अपुलें निघती बाहेर जे स्तन तियेचे ॥
कसची दया तयांना हृदया भेदावयास अन्याचे ॥३॥
जसि जसि समृद्धि अहितीं तसि तसि चिंतारुजा मनीं वाढे ॥
अमृतरसहि न शके मग तच्छमनीं काय बापुडे काढे ॥४॥
भारत मोरोपंत.

यादृढ मदभिप्रायापासुनि वारुं शके न शक्र मला ॥
मर्त्याची काय कथा पाकृतसा काय कर्ण हा गमला ॥५॥
कर्णपर्व.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP