मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
उपमेयोपमा

अर्थालंकार - उपमेयोपमा

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


अनुष्टुप्‍ -
उपमेयोपमा.
अनुष्टुप्‍-उपयेयोपमा दोन्ही । पर्यायानेंच कल्पिणें ॥
धनवद्‍धर्म-समृद्धि । धर्मवद्धनही तुझें ॥१॥

गद्य-
जेव्हां उपमानोपमेय पदें अशा प्रकारचीं असतात कीं, जें एक वेळ उपमेय असतें तेंच दुसरे वेळेस उपमान होतें, व जें पहिले
वेळेस उपमान असतें तेंच दुसरे वेळेस उपमेय होतें, तेव्हां हा अलंकार होतो. जसें, कोणी एक कवी एका राजास ह्णणतो, राजा ! तुझी
धर्मसमृद्धि धनसमृद्धिप्रमाणें आहे व तसेंअ धनसमृद्धि धर्मसमृद्धिप्रमाणें आहे.

आर्या -
आकाशतुल्य जल हें आकाशहि उदक - सदृश हें साच ॥
हंस-सदृश तुहिनांशु चंद्र सदृश हंस येथिल तसाच ॥२॥
गिरिवद्गजवर दिसतो गजराज-सदृश पर्वतहि भासे ॥
झरवन्मद-जल-धारा मद-धारा-सम झराहि शोभतसे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP