मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार| अर्थांतरन्यास अर्थालंकार उपमा अनन्वय उपमेयोपमा प्रतीप रुपक परिणाम उल्लेख स्मरण भ्रांतिमान् संदेह अपन्हुति उत्प्रेक्षा अतिशयोक्ति तुल्ययोगिता दीपक आवृत्तिदीपक प्रतिवस्तूपमा दृष्टांत निदर्शना व्यतिरेक सहोक्ति विनोक्ति समासोक्ति परिकर श्लेष अप्रस्तुतप्रशंसा प्रस्तुतांकुर पर्यायोक्त व्याजस्तुती व्याजनिंदा आक्षेप विरोधाभास विशेषोक्ति विभावना असंभव असंगती विषम सम विचित्र अधिक अल्प अन्योन्य विशेष व्याघात कारणमाला एकावली मालादीपक सार यथासंख्य परिवृत्ति पर्याय परिसंख्य विकल्प समुच्चय कारदीपक समाधि प्रत्यनीक काव्यार्थपत्ति काव्यलिंग अर्थांतरन्यास विकस्वर प्रौढोक्ति संभावना मिथ्याध्यवसिति ललित प्रहर्षण विषादन उल्लास अवज्ञा अनुज्ञा लेश मुद्रा रत्नावली तद्रूण पूर्वरुप अतद्रूण अनुगुण मीलित सामान्य उन्मीलीत विशेषक उत्तर सूक्ष्म पिहित व्याजोक्ति गूढोक्ति विवृतोक्ति युक्ति लोकोक्ति छेकोक्ति वक्रोक्ति स्वभावोक्ति भाविक उदात्त अत्युक्ति निरुक्ति प्रतिषेध विधि हेतु प्रत्यक्षप्रमाण अनुमान उपमानप्रमाण शब्दप्रमाण अर्थापत्ति अनुपलब्धि संभव ऐतिह्य अनुकूल आशी रसवत् प्रेय ऊर्जस्वित् समाहित भावोदय भावसंधि भावशबलता संसृष्टि संकर चेतनगुणोक्ति अर्थालंकार - अर्थांतरन्यास काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात. Tags : grammermarathiअलंकारमराठीव्याकरण अर्थांतरन्यास Translation - भाषांतर श्लोक-विशेषसामान्यमिलाफ जेथें । अर्थांतरन्यासाह जाण तेथें ॥तरे महासागर आंजनेय । मोटयास हो दुष्करणीय काय ॥१॥सामान्योक्ति व विशेषोक्ति हीं दोन्हीं जेव्हां एका ठिकाणीं येतात तेव्हां हा अलंकार होतो. जसे:-"आंजनेय (मारुती) महासागर तरला" हें एका विशेष व्यक्तीविषयीं झालें परंतु " मोठयाला करण्यास कठिण तें कोणतें" हा सामान्यसिद्धांत आहे. याप्रमाणेच: -आर्या-गुणवत्संबंधानें नीचहि पावे सदा महत्वास ॥माळेच्या संबंधें-सूत्रालाही घडे शिरीं वास ॥२॥विश्वासघात दुर्जन-वधहेतुचि वीर-कोप कर ह्णणुन ॥नव-तरु-भंग-ध्वनि जशि हरि हरि निद्रा गजास दे निधन ॥३॥श्लोक-आलिंगिताच शरदें मृगलांच्छनाला ।विद्युत्कटाक्षसह पाउसकाळ गेला ॥सौभाग्यरुप गुण कोण नितंबिनीचा ।होई न नष्ट परिभ्रष्ट पयोधरांचा ॥४॥रक्षीर वीपासुन जो तमाला । जसा गुहांमाजी उलूकमाला ॥मोठयाकडे जो शरणार्थि आला । विसंबती ते न कधीं तयाला ॥५॥आर्या-निर्बलहि एकवटतां साधे दुष्करहि कार्य भाग जरी ॥दोरी करुन तृणाची त्यायोगें बांधितात मत्त करी ॥६॥श्लोक-जे बोलती पार्वती ! पापवृत्तितें ।सौंदर्य उत्पन्न करी न सत्य तें ॥हें सुंदरी शील तुझें विलोकुनी ।घेतात त्याचा उपदेश कीं मुनी ॥७॥आर्या-सदिषुधिशतसंबाधी नमुनि उलूपीश शुभ रथीं चढला ॥कढला क्रोधें समयीं धर्मातें कां चुकेल जो पढला ॥८॥मोरोपंत भारत.श्लोक-हस्तीतें धुतलें जळीं बुडविलें मालिन्यही नासिलें ।तेणें तें अपुलें स्वकर्म वहिलें तीरींच आरंभिलें ॥शुंडाग्रें धरिलें धुळीस भरलें सर्वांगही आपुलें ।प्रायश्चित्त दिलें तथापि न भलें ज्याचें अमन क्षोभलें ॥९॥वामन.सेवी नित्य गुरु-जनांस सवती तू मैत्रिणीशा करी ।वागे कांत विरुद्ध तूं नच कधीं धि:कार केला जरी ॥होई फारचि सेवकीं सरल तूं भाग्यें अनुच्छेकिणी ।वत्से यापरि वागतात गृहिणी अन्या कुला जाचणी ॥१०॥आर्या-उन्मार्गगा तया ती धि:कारी श्री ह्णणे वराका मी ॥मानधन-सुता भार्या बुडवि धन-कुळा कलेवरा कामी ॥११॥उमारामायण.गद्य-अर्थांतरन्यासांतही काव्यलिंगाप्रमाणेच अर्थांची पुष्टीकरणापेक्षा असून त्याप्रमाणेंच पुष्टीकरण केलें जातें. परंतु अर्थांतरन्यासांत असें पुष्टीकरण असून दोन वाक्यांत एक सामान्य व एक विशेष असा संबंध असतो. काव्यलिंगांत अशा प्रकारचा संबंध नसतो. N/A References : N/A Last Updated : February 23, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP