मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
आक्षेप

अर्थालंकार - आक्षेप

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
स्वयें बोलिलें खोडणें जैं विचारें ।
तरी त्यास आक्षेप तुह्मी ह्णणा रे ॥
विधो ! दाखवी तूं मुखातें नव्हेच ।
अहो ! हा शशी; हें प्रियावत्क्र साच ॥१॥
साहित्यसिंधु मथितां उदयास येतें ।
जें काव्य रक्षण करा कवि हो तुह्मी तें ॥
काव्यार्थ चोर बहु ह्या जगतांत होती ।
जे अमृता दितिजसे लुटण्या पहाती ॥२॥
घेवोत ते सर्व यथेच्छ त्यातें ।
तोटा नसे हो ! कविच्या कृतीतें ॥
असंख्य रत्नें जरि काढियेलीं ।
रत्नाकराव्हा न कमी जहाली ॥३॥

श्लोक-
(२) यांत जो अर्थ दर्शविला आहे त्याचे उलटा अर्थ
श्लोक
(३) यांत दर्शविला आहे. याप्रमाणेंच.

आर्या-
निष्कृप कृपपणाचा लावील कलंक लोकपाळास ॥
छी ! हें सती करीना ठेविल बोल तो कपाळास ॥४॥
बृहद्दशम.

अनुष्टुप्‍-
निषेधाभास आक्षेप कोणी विबुध मानिती ॥
न मी दूती-तनू; ताप हा कालानलसा तिचा ॥५॥

येथें मी दूती नव्हें तर तिच्या देहाचा कालानलासारिखा हा तापच केवळ तुझेकडे आला आहे, असें दर्शविलें आहे. निषेधाचा
आभास मात्र आहे, खरोखर निषेध नाहीं. याप्रमाणेंच:-

नरेंद्रश्रेष्टा न अम्ही राजाचे दूत जाण बा ॥
जगत्कुटुंबी तूं आज शत्रू होती कसे ? तुला ॥६॥

श्लोक-
जेव्हां विधि व्यक्त, निषेध गुप्त ।
आक्षेप आख्याचि तयास युक्त ॥
प्राणप्रिया जा जरि जावयाचें ।
तेथेंच मज्जन्महि व्हावयाचें ॥७॥

आर्या-
जाणे तुझें न होइल तापद तें बहुत दिवस तूं जाण ॥
जाशिल तरि जा आतां सत्यचि हें प्रियतमा ! तुझी आण ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP