मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
समुच्चय

अर्थालंकार - समुच्चय

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
नाना भाव उपजती बहुतां जरि एकदां समुच्चय हो ॥
जाती पळून मागुति पाहति रिपुवर्ग त्रासती तुज हो ॥१॥

श्लोक-
वाहोनी तव दत्त शल्य हृदयीं प्रेमाचि आख्या जया ।
जें जें ते करि साधु ऐक विरहें संतप्त होवोनिया ॥
घेई झोंप, करी प्रलाप, सुकते, हो म्लान, ये ग्लानता ।
चाले, हो भ्रम, नष्टसी, कृश, गळे, लोळेहि, हो मूर्छिता ॥२॥
आर्या-पाय धरुनिया म्हणती रामा आम्ही तुझेच सांगाती ॥
रडती पडती पढती स्तोत्रें त्याच्याचि कीर्तिला गाती ॥३॥
मंत्ररामायण.

एका कार्यी मीच प्रथम असा भाव तरि समुच्चयच ॥
कुल, रुप, धन, सम्रुद्धि, वय, विद्या, उपजवीति मद साच ॥४॥

श्लोक-
जयाचें देणें न प्रगट, अतिथी पूजन वसे ।
धनें गर्वा पावे न, पर-जन-निंदारुचि नसे ॥
न सांगे कोणातें स्वसुकृति, पराची अयकवी ।
रती, शास्त्रीं ज्याची, कुलिन नर तो बोलति कवी ॥५॥

गद्य-
साहित्य दर्पणकारांनीं लक्षण असें दिलें आहे.जेव्हां गुणाचा अथवा क्रियांचा युगपद्‍ भाव होतो तेव्हां त्यास समुच्चय असें
म्हणतात. जसें: -

आर्या-
नेत्र तुझें अरुण गडे प्रियकर याचेंहि वदन मलिन सये ॥
मुख खालीं घालिसि तूं स्मरपावक अंतरीं जळे तुझिये ॥६॥

गद्य-
यांत पहिल्या अर्धांत गुण एकवटलेले आहेत. द्वितीय अर्धांत
क्रिया एकवटल्या आहेत.

आर्या-
सित-पंकेरुह समजे नेत्र तुझे कलुष शत्रुवर पडले ॥
आपत्कटाक्ष यांही तनुला त्यांच्या नृपेश्वरा वरिलें ॥७॥

गद्य-
ह्यांत गुण व क्रिया या दोन्ही एकवटल्या आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP