मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
ललित

अर्थालंकार - ललित

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
वर्ण्य वस्तुचें कथन सोडुनी । अन्य वस्तु तत्सदृश पाहुनी ॥
वर्णिजें जरी ललित जाण या । सेतु ती करी सलिल गेलिया ॥१॥
खरोखर जो वृत्तांत सांगावयाचा तो न सांगतां एकाद्या तत्सदृश
अप्रस्तुत वृत्तांताचें वर्णन करणें, त्यास ललित असें म्हणतात, जसें
ती स्त्री पाणी गेल्यावर सेतू बांधावयास लागली असा अप्रस्तुत वृत्तांत
सांगून खरी गोष्ट तशीच गुप्त ठेविली आहे. याप्रमाणेच: -

आर्या-
अवलंबिला तव सुतें भीमाब्धि तरावयासि हा प्लव गा ॥
मारुतिभंग घडेल प्रचुर-चणक चर्वणोद्धता प्लवगा ॥२॥

उद्योगपर्व.

कोठें वंश रवीचा कोठें कोती बहुत मन्मति हे ॥
दुस्तर जलधि तराया होडीनें मीहिं इच्छितों मोहें ॥३॥

गद्य-
साहित्यदर्पणकारांनीं या अलंकारास निदर्शनालंकार असें ह्मटलेलें आहे. काव्यप्रकाशकाराचेंहि मत तसेंच आहे.

श्लोक-
वसंतेंवना सोडितां हो दशा जी ॥
तिला पावला कोणता देश आजी ॥
कृतार्थचि संकेत होतां तुझा ती ॥
न संज्ञा मला ऐकण्या योग्य होती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP