TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
व्यतिरेक

अर्थालंकार - व्यतिरेक

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


व्यतिरेक
अनुष्टुप्‍-
उपमानोपमेयांचा विशेष व्यतिरेक तैं ॥
स्वभावें मृदु हे साधू गिरिवज्जरि उन्नत ॥१॥

उपमान व उपमेय यांपैकी जेव्हां कोणचेही एकामध्यें दुसर्‍या पेक्षां गुण अधिक दृष्टीस पडतो तेव्हां हा अलंकार होतो. जसें:-साधु
हे जरी पर्वतासारिखे उन्नत आहेत तरी स्वभावानें मृदु आहेत. येथें उपमान पर्वत व उपमेय साधु. उपमानापेक्षां उपमेयांत विशेष एक गुण आहे. या प्रमाणेंच खालींही:-

आर्या-
कल्पतरुचे पत्रा पेक्षां हा जास्त भासतोचि कर ॥
शोभति पहिलें कर्णा त्याचा दुसरा करी तिरस्कार ॥२॥
बळकटचि मूठ ज्यांची कोशनिषण्ण स्वभाव मलिन जरि ॥
कृपणकृपाणामध्यें आकाराचाच मात्र भेद तरि ॥३॥
तूं नूतन पत्रांहीं मीहि सखीच्या गुणेंकरुन रक्त ॥
तिकडे येति शिलीमुख इकडेहि तसेच स्मरधनुर्मुक्त ॥४॥
कांताचरणस्पर्शें आनंद तुला तसा मलाहि खरा ॥
सर्वचि तुजमजमध्यें सम मी शोकी अशोक तूंच बरा ॥५॥
या पुष्करापरीसहि सीतेचें नेत्रयुग्म बहु रुचिर ॥
दैवें तिजशीं मजशीं योग न राहूं दिला सख्या सुचिर ॥६॥
मंत्ररामायण.

गद्य-
साहित्यदर्पणकारांनीं हा अलंकार ४८ प्रकारचा मानिला आहे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-02-23T05:37:10.8430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

cold die quenching

  • शीत रुपद द्रुतशीलन 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.