मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ५५

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५५

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


हें प्रेम नव्हे साधारण । क्वचित एखादा पावे खूण । पावतांचि तद्रूप होऊन । राहे आपण सर्वकाळ ॥५७०॥
जयाचें जें बैसलें मनीं । तेंचि दिसों लागे प्रतिक्षणीं । तेचि वार्ता ऐके श्रवणीं । चिंतनही तयाचें ॥५७१॥
सर्वेंद्रिया मन प्रधान । जो जो आकार धरील जाण । तैसेचिं जडे इंद्रिया ध्यान । हा नियम सर्वत्र ॥५७२॥
कामी पुरुषापुढें काम । भयग्रस्तासी तोचि भ्रम । संशय उपजतां तोचि क्रम । सदा मन संशयीं ॥५७३॥
येणेंचि न्यायें पाहों जातां । मन प्रेमरूप होऊनि राहतां । सकल सृष्टीमाजी तत्वतां । तेंचि एक आभासो ॥५७४॥
पाहों जातां तेंचि दिसे । ऐकतां तेचि परियवसे । चिंतनासी विषय नसे । त्यांवाचून वेगळा ॥५७५॥
तन्मयता बोलिजे तें हेंचि । सर्वत्र प्रत्यय तयाचाचि । स्थूल सूक्ष्म चेतना चेतनेचि । सकल वार्ता बुडाली ॥५७६॥
स्वरूपमय झालें सकळ । आत्मानुभवें वृत्ति निश्चल । आत्मरूप ब्रह्मांड गोल । भेदाभेद निमाले ॥५७७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP